आजच्या धावपळीच्या जीवनात रात्रीचे जेवण वेळेवर करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशात ऑफिस, मित्रपरिवार, कुटुंब यांच्यासोबतच्या व्यस्त शेड्युलमुळे रात्रीच्या जेवणाचे वेळापत्रक 9 ते 11 वाजेपर्यंत पुढे ढकलले जाते. मात्र संध्याकाळी 7 वाजता जेवण केल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते, झोपे सुधारते आणि पचनक्रिया निरोगी राहते.
जेवणात कोणताही मोठा बदल न करता किंवा व्यायाम न करता, फक्त रात्रीचे जेवण ठीक 7 वाजता घेण्याची एक साधी सवय लावली एकाच आठवड्यात शरीरात असे बदल दिसले, ज्यामुळे तुमच्या अनेकजण चकीत होतील.
लवकर जेवणामुळे होणारे 6 आश्चर्यकारक फायदे
1. पोट हलके राहते आणि सकाळी लवकर जाग येते
रात्री उशीरा जेवल्यास सकाळी उठताना शरीर जणू काही ओझे घेऊन उठत आहे, असे वाटते. पण, रात्री 7 वाजता जेवण सुरू केल्यास एक मोठा फरक जाणवेल. रात्रीचे जेवण लवकर पचायला लागते आणि सकाळी उठल्यावर पोट खूप हलके वाटू लागते. डॉक्टर सांगतात की, अन्न पचण्यासाठी शरीराला किमान 3 ते 4 तास लागतात. उशीरा जेवण केल्यास ही पचनक्रिया रात्रीच्या वेळी बाधित होते.
2. झोपेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा
जेवणानंतर लगेच झोपल्यास पचनक्रिया बिघडते आणि शरीर अॅक्टिव्ह राहते. रात्री उशीरापर्यंत फोन स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे झोप नीट लागत नाही. मात्र, 7 वाजता डिनर केल्याने शरीराला झोपेपर्यंत 3 ते 4 तास आराम मिळतो. यामुळे लवकर झोप येते, 7 ते 8 तास शांत आणि गाढ झोप मिळते आणि सकाळी सुस्ती जाणवत नाही.
3. अॅसिडिटी, गॅसचा त्रास कमी होतो
जर तुम्हाला जेवणानंतर गॅसचा त्रास होत असेल, तर लवकर जेवण करणे ही समस्या अर्धी कमी करू शकते. याचे कारण म्हणजे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि जडपणाची समस्या आपोआप कमी होते.
4. वजनात किंचित घट दिसून आली
एका आठवड्यात वजन कमी होईल. शरीरातील चरबी कमी झाल्याचे जाणवेल. कंबर थोडी सैल झाली आणि चेहरा थोडा हलका दिसू लागेल. उशीरा जेवण साठवून ठेवण्याऐवजी शरीर त्या ऊर्जेचा वापर करू लागेल.
5. त्वचेवर चमक आणि सकाळी चेहऱ्यावर सूज नाही
उशीरा जेवण केल्याने ते पचायलाही उशीर लागतो, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर सूज किंवा निस्तेजपणा दिसतो. 7 वाजता डिनर केल्यास सकाळी चेहऱ्यावर अजिबात सूज दिसणार नाही. उलट एक हलकी चमक दिसू लागेल.
6. मनःशांती आणि तणाव कमी
रात्री लवकर पचन झाल्यामुळे, मेंदूलाही आराम मिळतो. लवकर जेवण केल्याने मेंदूला कमी ऊर्जा खर्च करावी लागते, शरीर रिलॅक्स मोडमध्ये लवकर जाते आणि तणाव देखील कमी होतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)