Blanched Almonds: उकडलेले बदाम खाल्ल्यास काय होते? ब्लँच्ड बदामाचे फायदे आणि तयार करण्याची योग्य पद्धत वाचा

Blanched Almonds Benefits: बदाम खाण्याची नवीन आणि आरोग्यदायी पद्धत म्हणजे 'ब्लँच्ड बदाम'. उकडलेले बदाम खाल्ल्याने पचन सुधारते, वजन कमी होण्यास मदत मिळते आणि हृदय निरोगी राहते. जाणून घ्या बदाम उकडण्याची सोपी पद्धत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Benefits Of eating Blanched Almonds: उकडलेले बदाम खाण्याचे फायदे"
Canva

Blanched Almonds Benefits: बदाम हे आरोग्यासाठी पावरहाऊस मानले जातात. लोक वेगवेगळ्या प्रकारे डाएटमध्ये बदामाचा समावेश करतात. कोणी भिजवून तर कोणी भाजून बदाम खातात. पण सध्या एक नवी पद्धत हळूहळू लोकप्रिय होतेय ती म्हणजे बदाम पाण्यात उकडून खाणे. उकडलेल्या बदामांना ब्लँच्ड बदाम असेही म्हटले जाते. या प्रक्रियेत बदामाची साल काढली जाते, ज्यामुळे त्याचे पचन सहजरित्या होते. तुम्हाला देखील डाएटमध्ये पौष्टिक पर्याय हवा असेल तर तुम्ही उकडलेले बदाम खाऊ शकता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

ब्लँच्ड बदाम म्हणजे काय? (What Are Blanched Almonds)

ब्लँच्ड बदाम म्हणजे बदाम उकळून त्याची साल काढली जाते. साल निघाल्यानंतर बदाम (Texture) मऊ होतात आणि चवही थोडी बदलते. याच कारणामुळे अनेक गोड पदार्थांमध्ये (Desserts) आणि पौष्टिक पदार्थांमध्ये उकडलेल्या बदामांचा समावेश करतात. 

Advertisement

बदाम उकडण्याची सोपी पद्धत (How To Make Blanched Almonds)

  1. सर्वात आधी पाणी चांगले उकळून घ्या.
  2. त्यात बदाम टाकून काही मिनिटे राहू द्या.
  3. त्यानंतर बदाम काढून थंड पाण्यात टाका.
  4. बदाम थंड झाल्यावर त्यावरील साल काढा. 

उकडलेले बदाम खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Blanched Almonds)

1. पचनासाठी फायदेशीर

साल काढल्यानंतर बदामाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. यामुळे पोट जड होत नाही आणि शरीराची पोषणतत्त्व शोषून घेण्याची प्रक्रियाही सुधारते. 

(नक्की वाचा: Pudina Benefits: पुदिन्याचे सेवन करणं 9 लोकांसाठी ठरेल वरदान, उन्हाळ्यात पुदिना खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)

2. हृदयाचे आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

उकडलेल्या बदामामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि आवश्यक खनिजे असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी (Bad Cholesterol) कमी होण्यास मदत मिळते. तसेच पोट देखील दीर्घकाळासाठी भरलेले राहते, परिणामी वजन कमी करण्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरतो.

(नक्की वाचा: Water Melon: मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावा की खाऊ नये? दिवसभरात किती प्रमाणात आणि कसे खावे कलिंगड? वाचा)

3. मेंदू आणि त्वचेसाठी लाभदायक

बदामातील व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे मेंदू सक्रिय राहण्यास मदत मिळते. तसेच हे घटक त्वचेला आतील बाजूनं पोषणतत्त्वांचा पुरवठा करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. नियमित बदामाचे सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते.  

उकडलेले बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. दिवसभरात पाच ते सात बदाम खाणे पुरेसे ठरेल. 

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )