Rice : भात खाल्ल्याने काय होतं? वजन कमी करायला कोणता तांदूळ खावा? जेवणामुळे वजन लवकर घटतं?

Best Rice For Weight Loss:भात हे भारतीय आहारातील मुख्य अन्न आहे. भातात कार्बोहायड्रेट्स असतं. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • वजन बढ़ने की समस्या आजकल अनहेल्दी लाइफस्टाइल और खराब खानपान के कारण बहुत आम हो गई है
  • चावल भारतीय भोजन का मुख्य हिस्सा है जो कार्बोहाइड्रेट से भरपूर होता है और शरीर को ऊर्जा देता है
  • सफेद चावल की तुलना में ब्राउन राइस वजन कम करने के लिए बेहतर विकल्प होता है क्योंकि इसमें फाइबर अधिक होता है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सध्या अनहेल्दी लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे वजन वाढलेलं  वजन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकदा शरीराचं वजन वाढू लागलं तर यावर नियंत्रण आणणं कठीण असतं. हे वाढलेलं वजन पुढे जाऊन अनेक आजारांचं कारण ठरू शकतं. वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या पर्यायांचा अवलंब करतात. कोणी आहार कमी करते, तर कोणी जिममध्ये घाम गाळतात. खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत बोलायचं झालं तर भारतात भाताचं सेवन अधिक केलं जातं. अधिकांश लोक दिवसातून एकदा भात खातात. तर काहींना दोन्ही वेळेस जेवताना भात हवाच असतो. तांदळात फायबर आणि अधिक कॅलरीज असतात. यामुळे भात खाल्ल्यानंतरही लवकर भूक लागते आणि वजन वाढण्याची भीती असते. 

भात खाल्ल्याने काय होतं? 

भात हे भारतीय आहारातील मुख्य अन्न आहे. भात मुख्यत: कार्बोहायड्रेटपासून तयार केलं जातं. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. लहान मुलं, खेळाडू आणि शारिरीक श्रम करणाऱ्यांसाठी भाताचं सेवनं फायदेशीर आहे. अनेकदा लोक भात खाल्ल्यामुळे आळस येत असल्याचं म्हणतात. मात्र भातात नैसर्गिकपणे कार्बोहायड्रेट्स असतात.   ज्यामुळे ऊर्जा वाढते. याशिवाय भातात काही विटॅमिन्स आणि खनिजंदेखील असतात, जे आरोग्यासाठी लाभकारी आहेत. 

नक्की वाचा - 10 मिनिटांची एक सवय, Heart Attack चा धोका 50 टक्क्यांनी कमी; डॉक्टरांनी दिला महत्त्वपूर्ण सल्ला

वजन कमी करण्यासाठी कोणता भात चांगला?

अधिकांश लोक पांढरा तांदूळ खातात. मात्र हा तांदूळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जात नाही. वजन कमी करणाऱ्यांनी ब्राऊन राइसचं सेवन करावं.  ब्राऊन राइस पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक फायबरयुक्त, पोषण तत्वांची भरपूर असतं. फायबरचं प्रमाण अधिक असल्याने ब्राऊन राइस बराच काळ पोट भरलेलं ठेऊ शकतो. ब्राऊन राइस पचनासाठीही फायदेशीर आहे. 

Advertisement

कोणते पदार्थ सर्वात जलद वजन कमी करतात?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. कोणताही एकच पदार्थ सर्वात जलद वजन कमी करू शकत नाही. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, कॅलरी नियंत्रण आणि शारीरिक हालचाली आवश्यक आहेत. शिवाय, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वजन कमी करण्यास मदत करू शकते.

Topics mentioned in this article