Office Affair Disadvantages : ऑफिसमध्ये लव्ह अफेअर सुरुवातीला सोपं आणि चांगलं वाटू शकतं,पण याचे भविष्यात गंभीर परिणाम होतात. हे विसरून चालणार नाही. योग्य निर्णय तोच आहे,जो तुमचं करिअर,मानसिक शांती आणि प्रोफेशनल ग्रोथसाठी चांगला असेल.अनेकदा सोबत काम केल्यावर मैत्रिचं रुपांतर लव्ह अफेरमध्ये कधी बदलतं,हे अनेकांना कळतच नाहीत. सुरुवातीला सगळंकाही चांगलं वाटतं. लंच एकत्र करणं, बोलणं कमी आणि कनेक्शन मजबूत.पण तुम्ही कधी विचार केला आहे, हेच नातं हळूहळू तुमचं काम, इमेज आणि नातेसंबंधावर परिणाम करू शकतं.कारण ऑफिसमध्ये प्रेम फक्त वैयक्तिक गोष्ट नसते,याचा परिणाम संपूर्ण प्रोफेशनल लाईफवर पडतो.
त्यामुळे तुमच्या करिअरचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ऑफिसमध्ये रिलेशनशिप सुरू करण्याआधी यामुळे होणारे धोके ओळखले पाहिजेत. ऑफिसमध्ये एकत्रित काम केल्याने अनेकदा लोकांमध्ये जवळीक वाढते.सुरूवातीला हे नातं सोपं आणि चांगलं वाटतं. पण तुम्ही कधी विचार केलाय,या लव्ह अफेअरमुळे तुमचं करिअर आणि वैयक्तिक जीवनावरही याचा वाईट परिमाण होऊ शकतो.
नक्की वाचा >> Sangli News: सांगली हादरलं! मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले अन् घडलं भयंकर, 6 भाविक ठार, 10 जखमी
ऑफिसमध्ये लव्ह अफेअर का करू नये?
1) प्रोफेशनल इमेज खराब होते
ऑफिसमध्ये अफेअर केल्याने लोक तुम्हाला कामापेक्षा तुमच्या वैयक्तिक जीवनावर जास्त लक्ष देतात. यामुळे तुमची प्रोफेशनल इमेज कमकुवत होते.
2) टीम वर्कमध्ये अडचणी येऊ शकतात
जर नातं मजबूत राहिलं नाही किंवा ब्रेकअप झालं,तो याचा थेट परिणाम टीम वर्कवर पडू शकतो. यामुळे कामाच्या वेळी वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत 451 धोकादायक इमारती, अतिधोकादायक किती? रहिवाशांना थक्क करणारी आकडेवारी समोर
3) ऑफिस पॉलिसीचं उल्लंघन
अनेक कंपन्यांमध्ये कलिग्ज यांच्या रिलेशनशिपबाबत कडक नियम असतात. अशातच अफेअर करणं तुमच्या नोकरीसाठी घातक ठरू शकतं.
4) पक्षपाताचा आरोप लागू शकतो
जर तुम्ही दोघेही एकाच टीममध्ये असाल किंवा सीनिअर-ज्युनिअर रिलेशनशिप असेल, तर दुसऱ्यांना पक्षपातासारखं वाटू शकतं. यामुळे वाद वाढू शकतो.
5) वैयक्तिक जीवनावरही परिणाम
ऑफिसमधील नातेसंबंध बिघडले, तर त्याचा परिणाम फक्त ऑफिसपर्यंतच राहत नाही. हे तुमचं मानसिक तणाव आणि वैयक्तीक जीवनावरहरी प्रभावित करू शकतो.