जाहिरात

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत 451 धोकादायक इमारती, अतिधोकादायक किती? रहिवाशांना थक्क करणारी आकडेवारी समोर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे.

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत 451 धोकादायक इमारती, अतिधोकादायक किती? रहिवाशांना थक्क करणारी आकडेवारी समोर
High Risk Buildings In KDMC

KDMC High Risk Buildings : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. केडीएमसी परिसरात तब्बल 225 इमारती अतिधोकादायक आहेत. तसेच शहरात एकूण 451 धोकादायक इमारती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या धोकादायक इमारतींपैकी ज्या इमारतींना स्ट्रक्चरल अभियंत्यांनी दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे,त्या इमारतींना पालिकेकडून दुरुस्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

तसेच अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना इमारत रिकामी करण्यासाठी नोटिसा पाठवण्याची सुरुवात झाली आहे. या रहिवाशांना इमारतीच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी पालिकेच्या 10 प्रभाग कार्यालयांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण हादरलं! भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, भयानक कारण आलं समोर

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

संबंधित इमारती रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान,धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे. 

नक्की वाचा >> Sangli News : एका भावाने दुसऱ्या भावाला संपवलं, दारूच्या नशेत असं काही केलं..कुटुंबालाही विश्वास बसला नाही

Listen to the latest songs, only on JioSaavn.com