What is the full form of PVR? : अनेकदा कंपन्या लक्ष वेधण्यासाठी संक्षिप्त (Company acronyms) किंवा शॉर्ट नावं वापरतात. सिंगल थिएटरचं रुपांतर मल्टिप्लेक्समध्ये करणारा पीव्हीआर हा देशातील प्रसिद्ध ब्रँड. या ब्रँडने नागरिकांची मानसिकता बदलली. त्यांनी केलेल्या एका छोट्या बदलामुळे प्रेक्षक एकाच ठिकाणी अनेक चित्रपट पाहू लागले. आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत भागीदारी करून सुरू केलेल्या या ब्रँडचं नाव आहे PVR. आज आपण आवडीने फॅन्सी अशा पीव्हीआरमध्ये जाऊन ७०० रुपयांचे पॉपकॉन खात चित्रपट पाहतो. मॉर्डन वाटणाऱ्या पीव्हीआरचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे का?
PVR चा फुल फॉर्म काय आहे? (PVR full form tending on social media)
भारतातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स साखळी पीव्हीआरचा फूल फॉर्म सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा फुल फॉर्मचा तुम्ही अंदाजही बांधू शकणार नाही. साधारण तीन वर्षांपूर्वी पीव्हीआर आणि INOX चं विलीनीकरण झालं. अशा या पीव्हीआरचा फुल फॉर्म आहे... प्रिया विलेज रोड शो (Priya Village Roadshow) हा फुल फॉर्म वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण हे खरं आहे.
बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी पहिली निवड असलेल्या पीव्हीआरचं फुल फॉर्म मॉर्डन असेल असं वाटलं असेल, मात्र प्रत्यक्षात पीव्हीआरचं नाव Priya Village Roadshow आहे.
नक्की वाचा - Emotional Video : 'मर्द को भी दर्द होता है'; बोरीवली स्थानकावरील तरुणाचा 'तो' हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ
Priya Village Roadshow हे नाव कसं पडलं?
1990 मध्ये अजय बिजली या तरुणाचं दिल्लीमध्ये प्रिया सिनेमाज नावाचं थिएटर होतं. त्यावेळी तिथं सिंगल स्क्रिन होतं. या तरुणाने भारतात मल्टिप्लेक्सची संकल्पना आणली. ज्यामध्ये तुम्हा एकाच ठिकाणी अनेक चित्रपट पाहून शकता. यासाठी त्याने ऑस्ट्रेलियन कंपनीची मदत घेतली. या कंपनीचं नाव होतं Village Roadshow Private Limited. या दोन्ही कंपनीने एकत्र येत भारतात मल्टिप्लेक्सची सुरुवात केली. दोघांनी एकत्र येत नवी कंपनी सुरू केल्यामुळे याचं नाव झालं Priya Village Roadshow.