जाहिरात

Meow Meow: विचित्र नाव असलेलं म्याऊं-म्याऊं ड्रग्ज काय आहे? तरुणांमध्ये इतकं प्रसिद्ध का आहे? भयंकर दुष्परिणाम

Meow Meow Drug Explained: सध्याच्या काळात अमली पदार्थांचं जाळं वेगानं पसरत आहे. 'म्याऊं म्याऊं' (Meow Meow) नावाच्या ड्रग्जने पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

Meow Meow: विचित्र नाव असलेलं म्याऊं-म्याऊं ड्रग्ज काय आहे? तरुणांमध्ये इतकं प्रसिद्ध का आहे? भयंकर दुष्परिणाम
  • मेफेड्रोन या म्याऊं-म्याऊं ड्रग भारत में युवाओं के बीच तेजी से लोकप्रिय सिंथेटिक स्टिमुलेंट है
  • यह ड्रग शरीर को नुकसान पहुंचाने के साथ मानसिक स्वास्थ्य को भी गंभीर रूप से प्रभावित करती है
  • म्याऊं-म्याऊं के सेवन से नाक से खून आना, दिल की धड़कन असामान्य होना और डिप्रेशन जैसी समस्याएं होती हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Meow Meow Drug Explained : सध्याच्या काळात अमली पदार्थांचं जाळं वेगानं पसरत आहे. 'म्याऊं म्याऊं' (Meow Meow) नावाच्या ड्रग्जने पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या ड्रग्जशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 

'म्याऊं म्याऊं' म्हणजे काय?

याचं शास्त्रीय नाव 'मेफेड्रोन' (Mephedrone) असं आहे. याला 'मॅजिक', 'ड्रोन' किंवा 'एम-कॅट' या नावानेही ओळखले जाते. हे प्रामुख्याने पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात असतं. कोकेन किंवा हेरॉइनच्या तुलनेत 'म्याऊं म्याऊं' अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होतं. त्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थी आणि तरुण वर्ग याकडे सहज आकर्षित होतो. म्याऊं म्याऊं हे घेतल्यावर व्यक्तीला खूप उत्साही, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटू लागतं. भूक आणि झोप कमी होते. ज्यामुळे लोक तासन् तास पार्टी करू शकतात. मेफेड्रोन २०१५ मध्ये NDPS अॅक्ट अंतर्गत बंदी घालण्यात आली होती.

जीवघेणं ड्रग्स....

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक असून त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. यामुळे  Hallucinations, भीती वाटणे, चिडचिड होणे आणि नैराश्य येणे असे प्रकार घडतात. हे ड्रग्स घेतल्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. याशिवाय  रक्तदाब वाढतो, शरीराचे तापमान प्रचंड वाढतं यांसारखे त्रास होतात. हे ड्रग्ज एकदा घेतल्यावर त्याचं व्यसन लागतं. व्यक्ती त्याशिवाय राहू शकत नाही. यामुळे किडनी आणि यकृतावरही गंभीर परिणाम होतात. याच्या विळख्यातून वाचण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे आणि जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com