सावधान! आठवणीमुळे नव्हे तर या समस्येमुळे येते उचकी, जाणून घ्या वैज्ञानिक कारण 

Uchaki Ka Yete: उचकी येण्यामागील खरं कारण माहितीये का?

जाहिरात
Read Time: 2 mins

उचकी येणे सुरू झाल्यानंतर आपल्या आसपास असणारे लोक लगेचच म्हणतात की,"अरे कोणीतरी तुझी आठवण काढत असेल". यानंतर आपण देखील एक-एक करून लोकांचे नाव घेण्यास सुरुवात करतो.  कोण असेल बरं इतकी आठवण काढणारे? याचा विचार करत मेंदूवर जोर देऊन-देऊन नावं आठवू लागतो. पण खरंच कोणीतरी आठवण काढते म्हणून उचकी येते की यामागे कोणते अन्य कारण आहे? 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोणीतरी आठवण काढते म्हणून उचकी येते?

उचकी येताच आपण आपल्या नातेवाईकांपासून ते मित्रमैत्रिणींपर्यंत सर्वांचे नाव आठवतो. हा उपाय केल्यानंतरही काही न झाल्यास लोक उचकी थांबण्यासाठी पाणी पितात. पण उचकी आणि कोणीतरी आठवण काढणे याचा दूरदूरवर काहीही संबंध नाहीय. उचकी येण्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे? हे जाणून घेऊया...

(नक्की वाचा: Hair Care Tips: केस होतील घनदाट आणि लांबसडक, असा करा तुपाचा वापर)

उचकी येण्यामागील वैज्ञानिक कारण 

वैज्ञानिकांच्या मते, उचकी येणे याचा आपल्या श्वासोच्छवासाशी संबंध असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपल्या पचन किंवा श्वसन प्रणालीमध्ये एखादी समस्या उद्भवते त्यावेळेस उचकी येते. काही वेळाकरिता उचकी येणे ही स्थिती त्रासदायक ठरते. अतिशय जलदगतीने खाल्ल्यास किंवा काही प्यायल्यास अचानक उचकी येऊ शकते. श्वासोच्छवासाशी संबंधित असणारे स्नायू अचानक आंकुचन पावतात, त्यावेळेस व्होकल कॉर्ड्स बंद झाल्यानं 'हिक' असा आवाज ऐकू येतो. 

Advertisement

(नक्की वाचा: Weight Loss Tips : वजन झटकन कमी करायचंय? फॉलो करा 6-6-6ची जबरदस्त ट्रिक)

    दरम्यान उचकी येण्यामागील कारण स्पष्ट नाहीय. डायफ्रामवर येणारा दबाव हे यामागील मुख्य कारण आहे. सलग काही वेळ राहणाऱ्या उचकीमुळे लोक वैतागतात. यामुळे मुख्य कारण म्हणजे जलदगतीने खाणे, गरम किंवा तिखट पदार्थ, अपचन, मद्यसेवन, धूम्रपान, तणाव, दुर्गंध, गर्भावस्था इत्यादी असू शकतात.

    आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की मग लोक आठवणी वगैरेचे विषय का काढतात. तर केवळ तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, जेणेकरून तुमची उचकी थांबण्यास मदत मिळेल.   

    Advertisement

    (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )