6-6-6 Walking Rule Tips : शरीर सुडौल आणि सुंदर दिसावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अयोग्य लाइफस्टाइल आणि जंक फुड-फास्ट फुडच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होऊन वजन वाढते. मग वाढलेले वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक योग आणि जिम एक्सरसाइजची मदत घेतात. जेणेकरून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल. जिममध्ये कठीण स्वरुपातील व्यायाम करण्याचा फायदा काही लोकांना होतो तर काही लोकांमध्ये मुळीच बदल दिसून येत नाहीत. मग आता वेटलॉससाठी नेमके काय करावे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना काही केल्या सापडत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुम्ही देखील याच विचारामुळे त्रस्त आहात का? तर मग चिंता करू नका. महिन्याभरामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही वॉकिंगचा 6-6-6 नियम फॉलो करू शकता. हा नियम फॉलो केल्यास तुमचे शरीर सुडौल होण्यास मदत मिळू शकते. Walking 6-6-6 नियमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
(नक्की वाचा: वजन कमी करण्याच्या नावाखाली तुम्हीही दिवसभर पिताय गरम पाणी? वेळीच व्हा सावध)
6-6-6 वॉकिंग नेमके काय असते? What Is 6-6-6 Walking
- 6-6-6 Walking Rule हे एक फिटनेस रुटीन आहे. ज्यामध्ये सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता 60 मिनिटांचा वॉक करायचा असतो.
- चालण्याचा व्यायाम करण्यापूर्वी 6 मिनिटे वॉर्मअप करावा. वॉक केल्यानंतर 6 मिनिटांसाठी कुल डाऊन सेशन करणेही आवश्यक आहे.
- वर्क आऊट रुटीनमध्ये तुम्ही चालण्याच्या व्यायामाचा समावेश केल्यास वजन कमी होण्यासह हृदयाचे आरोग्य निरोगी राहील आणि तणाव-चिंता यासारख्या मानसिक समस्यांपासूनही सुटका मिळेल.
- 6-6-6 Walking Rule फॉलो केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत मिळेल आणि यानंतर शरीरामध्ये चरबी जमा होणार नाही.
(नक्की वाचा: पटापट वेटलॉससाठी फॉलो करा हे डाएट प्लान, विराट कोहली-दिशा पाटनीचंही आहे तेच सीक्रेट)
- 6-6-6 वॉकिंग रूलमुळे शरीराची लवचिकता वाढते. यासह आळस कमी होऊन शरीरातील ऊर्जाही टिकून राहते.
- चालण्याच्या व्यायामामुळे शरीराचे स्नायूही मजबूत होतात.
- नेशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या (NIH) रिपोर्ट्सनुसार, नियमित स्वरुपात 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यास 35 टक्के हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.
- नियमित 60 मिनिटे चालल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. यासह शारीरिक-मानसिक तणावही कमी होतो.
- मधुमेहग्रस्तांसाठी नियमित स्वरुपात चालण्याचा व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्तशर्करेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world