- पाश्चात्त्य देशांमध्ये स्टार्टर मॅरेज नावाचा ५ वर्षांपेक्षा कमी काळ टिकणारा लग्नाचा प्रकार चर्चेत आहे
- या लग्नात जोडप्याला मूल नसते आणि गरज भासल्यास ते कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन वेगळे होऊ शकतात
- स्टार्टर मॅरेजचा उद्देश तरुणांना लग्नाचा अनुभव देणे आणि नात्याची चाचणी घेण्याची संधी प्रदान करणे हा आहे
भारतात लग्न हे एक पवित्र बंधन मानलं जातं. लग्न म्हणजे सात जन्मांचं अतूट बंधन मानला जातं. परंतु, पाश्चात्त्य देशांमध्ये लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. सध्या तिथे 'स्टार्टर मॅरेज' (Starter Marriage) नावाचा एक नवा ट्रेंड कमालीचा चर्चेत आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे एक प्रकारचे 'ट्रायल मोड'वरील लग्न आहे. जे जमलंच नाही तर अवघ्या काही वर्षांत संपुष्टात येते. पाश्चिमात्य देशात हा सध्या ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र त्याची जोरदार चर्चा भारतात ही होवू लागली आहे. या लग्नात काय अटी शर्ती असतात ते आपण पाहणार आहोत.
काय आहे 'स्टार्टर मॅरेज'?
'स्टार्टर मॅरेज' म्हणजे अशी पहिली लग्नव्यवस्था जी साधारणपणे 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी काळ टिकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या लग्नादरम्यान जोडप्याला मूलबाळ नसते. हे नाते घटस्फोटाने संपते. तरुण पिढी याकडे एक 'अनुभव' म्हणून पाहते. या काळात एकमेकांसोबत राहून, जर सूर जुळले नाहीत, तर कायदेशीररित्या वेगळे होऊन दोघेही आयुष्यात पुढे निघून जातात. भारतात अद्याप हा प्रकार नाही. पण त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. लग्न करायचे जमले तर ठिक नाही दुसरा मार्ग मोकळा असचं याचं स्वरूप आहे.
1994 मध्ये पहिल्यांदा वापर
या संकल्पनेचा इतिहास रंजक आहे. 'स्टार्टर मॅरेज' हा शब्द सर्वात आधी 'न्यू यॉर्क टाइम्स'मध्ये वापरला गेला होता. पत्रकार डेबोरा शूपॅक यांनी 1994 मध्ये आपल्या एका लेखात या शब्दाचा वापर केला होता. आज कित्येक वर्षांनंतर हा ट्रेंड पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. नात्यांमध्ये येणारा दुरावा आणि वाढते घटस्फोट या पार्श्वभूमीवर परदेशात सध्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा आहे. याला 'स्टार्टर मॅरेज' असं नाव देण्यात आलं आहे. भारतात जिथे लग्नाचे निर्णय संपूर्ण आयुष्यासाठी घेतले जातात, तिथे परदेशातील तरुण आता 'लग्नाचाही अनुभव' घेऊन पाहत आहेत.
आजकालच्या तरुणाईसाठी 'स्टार्टर मॅरेज' म्हणजे नात्याची चाचणी घेण्याची एक संधी बनली आहे. जोडपी काही काळासाठी एकत्र राहतात आणि आपण भविष्यात एकत्र जगू शकतो का, याचा अंदाज घेतात. 5 वर्षांच्या आत जर वाद वाढले किंवा पटलं नाही, तर कोणतीही गुंतागुंत न ठेवता हे लग्न घटस्फोटावर संपते. मुलं नसल्यामुळे कायदेशीर प्रक्रियाही सोपी होते.
भारतीय मानसिकतेपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world