Menstrual Cycle History: मासिक पाळी (menstrual cycle) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. बदलत्या लाइफस्टाइलनुसार आता बाजारात महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होऊ लागले आहेत, ज्यामुळे महिलांना या काळात खूप आराम मिळतो आणि कपडे खराब होणे किंवा कपड्यांवर डाग लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पूर्वीच्या काळात जेव्हा पॅड्स वगैरे प्रकार नसायचे तेव्हा महिला कपडे खराब होऊ नये म्हणून काय वापरायच्या?
त्या काळात महिलांना अशी अनेक कामे करावी लागायची ज्यामध्ये शारीरिक कष्ट खूप जास्त असायचे. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक पारंपरिक पद्धती अवलंबल्या, जेणेकरून मासिक पाळीदरम्यान आराम मिळू शकेल. या पद्धती पूर्णपणे नैसर्गिक होत्या, ज्यातून त्यांना खूप मदत व्हायची. चला तर मग जाणून घेऊया की त्या काळातील महिला पॅड्सऐवजी काय वापरायच्या?
(नक्की वाचा: Monsoon Diet Tips: पावसाळ्यात चुकूनही या 3 भाज्या खाऊ नका, वाढेल आजारांचा धोका! अपोलो हॉस्पिटलचा मोठा इशारा)
महिला 'मेन्स्ट्रुअल बेल्ट'चा वापर करायच्या
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये 20व्या शतकाच्या शेवटापर्यंत महिला मासिक पाळीदरम्यान हाताने तयार केलेल्या 'मेंस्ट्रुअल बेल्ट'चा (मासिक पाळीचा पट्टा) वापर करत असत. होय, त्या काळात पॅड्सबाबत कोणी विचारही केला नव्हता. या बेल्टमध्ये कापडाचा एक साधा पाऊच (पिशवी) असायचा जो कमरेला बांधला जायचा. यामध्ये रक्त शोषून घेण्यासाठी प्रामुख्याने लाकडाच्या राखेचा वापर केला जायचा, जी घरात स्वयंपाकासाठी जाळलेल्या लाकडापासून मिळायची.
राखेचा केला जायचा वापर?
(@seetheecreator) च्या व्हिडीओनुसार ही राख नंतर खत तयार करण्यासाठी वापरली जात असे. स्वच्छता राखण्यासाठी तो कापडाचा पाऊच नदीच्या पाण्यात धुवून वाळवला जात असे.
(नक्की वाचा : Footwear Odor Removal: पावसाळ्यात बुटांना सडल्यासारखा घाणेरडा वास येतोय का? फॉलो करा या 4 टिप्स, वास होईल कमी)
ही पद्धत महिलांसाठी सुरक्षित होती का?
'रीसर्च गेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार राखेमध्ये असणारे रसायने आणि अशुद्धता योनीच्या (Vagina) नैसर्गिक वातावरणाला हानी पोहोचवतात, ज्यामुळे यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल वेजिनोसिस (BV) चा धोका अनेक पटींनी वाढतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )