Health Tips: नखे सांगतील तुमच्या आरोग्याचे गुपित! 'ही' 5 लक्षणे दुर्लक्ष करणे महागात पडेल; वेळीच व्हा सावध

नखे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ती तुमच्या शरीरातील पोषक तत्वांच्या स्थितीचा आरसा आहेत. नखांवरील पांढरे डाग, उभ्या रेषा किंवा नखांचा बदललेला आकार हे लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेचे संकेत असू शकतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Health Tips: शरीरात जेव्हा पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते, तेव्हा आपली त्वचा, केस आणि नखे त्याचे संकेत देऊ लागतात. अनेकदा रक्ताची चाचणी (Blood Test) करण्यापूर्वीच तुमची नखे तुम्हाला कोणत्या तरी आजाराची पूर्वसूचना देत असतात.

तुमची नखे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ती तुमच्या शरीरातील पोषक तत्वांच्या स्थितीचा आरसा आहेत. नखांवरील पांढरे डाग, उभ्या रेषा किंवा नखांचा बदललेला आकार हे लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेचे संकेत असू शकतात. जनरल फिजिशियन डॉ. शालिनी सिंह यांनी सांगितलेले हे 5 महत्त्वाचे लक्षणे वेळीच ओळखून गंभीर आजार कसे टाळता येतील. डॉ. शालिनी सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Advertisement

नखांवरील ही 5 लक्षणे आणि त्यांचा अर्थ

1. पांढरे लहान डाग (White Spots)

जर तुमच्या नखांवर लहान पांढरे डाग दिसत असतील, तर त्याला वैद्यकीय भाषेत 'ल्यूकोनेकिया' म्हणतात. हे शरीरातील झिंक (Zinc) च्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे.

2. चमच्याच्या आकाराची नखे (Spoon-Shaped Nails)

जर तुमची नखे मध्यभागी दबलेली आणि कडेने वर आलेली दिसत असतील (चमच्यासारखा आकार), तर हे शरीरात लोहाची (Iron) कमतरता किंवा ॲनिमिया असल्याचे संकेत आहेत.

3. नखे लवकर तुटणे (Brittle Nails)

जर नखे कडक नसून ती सहजपणे किंवा वारंवार तुटत असतील, तर तुमच्या शरीरात बायोटिन (Biotin) आणि प्रोटीन (Protein) ची कमतरता असू शकते.

4. नखांवर उभ्या रेषा (Vertical Ridges)

नखांवर लांब किंवा उभ्या रेषा दिसणे हे व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) च्या कमतरतेचे लक्षण आहे. याशिवाय, हे डिहायड्रेशन किंवा वाढत्या वयाचे संकेत देखील असू शकतात.

Advertisement

5. दोन समांतर पांढऱ्या रेषा (Parallel White Lines)

नखांवर दोन पांढऱ्या समांतर रेषा दिसणे हे शरीरात प्रोटीनची (Protein) गंभीर कमतरता असल्याचे दर्शवते.

इतर गंभीर आजारांचे संकेत

  • पिवळी नखे: नखे पिवळी पडणे हे व्हिटॅमिन ई ची कमतरता, बुरशीजन्य संसर्ग, थायरॉईड किंवा यकृताचे आजार (पीलिया/कावीळ) असू शकतात.
  • वारंवार फंगल इन्फेक्शन: जर नखांना वारंवार संसर्ग होत असेल, तर हे डायबिटीज (Diabetes) चे लक्षण असू शकते.
  • नखांवर खड्डे पडणे: नखांवर छोटे खड्डे किंवा छिद्र दिसणे हे सोरायसिस किंवा एलोपेसिया एरिटा सारख्या ऑटोइम्युन आजारांचे लक्षण असू शकते.
  • लाल रेषा: नखांवर लाल रेषा दिसणे हे हृदयाच्या झडपांमध्ये  संसर्ग असल्याचे गंभीर संकेत असू शकतात.

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण सतत जाणवत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

Topics mentioned in this article