Indira Ekadashi 2024: इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी 

Indira Ekadashi 2024: इंदिरा एकादशी कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त, पितरांसाठी का महत्त्वाची असते ही एकादशी? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर...

Advertisement
Read Time: 2 mins

Indira Ekadashi 2024: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये (Pitru Paksha 2024) येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात. पितृपक्षामध्ये ही एकादशी येते म्हणून यास 'पितृ एकादशी' असेही संबोधले जाते. या एकादशीचे वेगळे असे महत्त्व आहे. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते. या एकादशीला विशेषत: श्री शाळीग्रामाच्या, भगवान विष्णू (Lord Vishnu) किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीस पंचामृत स्नान, अभिषेक करून पूजा केली जाते. यंदा 28 सप्टेंबरला इंदिरा एकादशी (Indira Ekadashi) आहे. एकादशीची तिथी किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत आहे? पूजा कशी करावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

इंदिरा एकादशीचा शुभ मुहूर्त (Indira Ekadashi Shubh Muhurat 2024)

एकादशी तिथी प्रारंभ : शुक्रवार 27 सप्टेंबर 2024, दुपारी 01 वाजून 20 मिनिटे 

एकादशी तिथी समाप्ती : शनिवार 28 सप्टेंबर 2024, दुपारी 02 वाजून 50 मिनिटे 

जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत करणार असणार असाल तर 29 सप्टेंबरला सकाळी 6.21 ते सकाळी 9.05 वाजदरम्यान उपवास सोडावा. 

(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)

इंदिरा एकादशी पूजा विधी 

  • पहाटे उठून स्नान करावे
  • शुभ मुहूर्तामध्ये भगवान शाळीग्रामाला गंगाजलने स्नान घालावे.
  • पूजेचे ठिकाण स्वच्छ करून चौरंग ठेवावा. त्यावर श्रीविष्णूंची मूर्ती स्थापित करावी. 
  • यानंतर गंगाजल, फुले, गंध, अक्षता अर्पण करावे. 
  • श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आठवणीने तुळस अर्पण करावी. 
  • धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून श्रीविष्णूंची आरती करावी. 
  • याशिवाय विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
  • पठण झाल्यानंतर गाय आणि कावळ्यांना जेवण द्यावे, असे केल्यास पूर्वजांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते. 
  • भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पिवळी फुले, वस्त्र, नैवेद्य अर्पण करा.  

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.