21 Seconds Peeing Benefits: लघवी करण्यासाठी किती वेळ लागला पाहिजे? हा प्रश्न वाचून तुम्हीही कोड्यात पडाल. पण एका संशोधनात (मूत्राशयावरील अभ्यास) या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या.जर तुमचा ब्लॅडर पूर्णपणे भरलेला असेल, तर तो रिकामा होण्यासाठी साधारणपणे 21 सेकंद लागतात. हा नियम फक्त प्राण्यांवरच नाही,तर माणसांवरही लागू होतो.डॉक्टरदेखील याला एक सोपा आरोग्य निर्देशक मानतात.लघवी करण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या ब्लॅडरची क्षमता,शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि मूत्रविषयक आरोग्याबद्दल खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
21 सेकंद लघवी करण्याचा नियम काय आहे?
जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी‘लघवीचा नियम'या विषयावर एक संशोधन केले.प्राणीसंग्रहालयात केलेल्या एका संशोधनात अशी माहिती समोर आली की, मोठ्या आकाराचे बहुतेक सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स त्यांचा ब्लॅडर 21 सेकंदात रिकामा करतात.माणसांमध्ये ही वेळ जवळपास इतकीच असतो.डॉ.मिलर यांसारखे यूरोलॉजी तज्ज्ञ सांगतात की,याला ‘20 सेकंद नियम' म्हणू शकतात. म्हणजेच,जर तुम्ही पूर्ण भरलेल्या ब्लॅडरसह लघवीला गेला आणि लघवी करण्यासाठी साधारणपणे 20-21 सेकंद लागले, तर तुमचा ब्लॅडर सामान्यपणे काम करत आहे.
नक्की वाचा >> Alcohol Precautions : दारू प्यायल्यानंतर उल्टी होते? 'या' गोष्टी लगेच करा, टल्ली झाल्यावरही नशा झटपट उतरेल!
तुमच्या आरोग्यासाठी वेळ का महत्त्वाची असते?
लघवी करण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या शरीरातील हायड्रेशन लेव्हल आणि युरिनरी ट्रॅक्टच्या आरोग्याचं संकेत देतो.
- खूप कमी वेळ (5-10 सेकंद): याचा अर्थ तुमचा ब्लॅडर पूर्णपणे भरलेला नव्हता किंवा तुम्ही खूप वेळा वॉशरूमला जाता. हे ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडरचे लक्षण असू शकते.
- खूप जास्त वेळ (30 सेकंद किंवा त्याहून अधिक): हे ब्लॅडरच्या स्नायूंची कमजोरी, युरिनरी ट्रॅक्टमध्ये अडथळा किंवा प्रोस्टेटशी संबंधित समस्यांचे संकेत देऊ शकते.
जर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची इच्छा होत असेल, तसच मध्येच थळा येत असेल किंवा लघवी करताना वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नक्की वाचा >> Snake Bite First Aid: साप चावल्यावर सर्वात आधी काय करावं? 'हा' सोपा उपाय करायला अजिबात विसरू नका!
हा नियम पाळावा का?
हा कोणताही वैद्यकीय तपास नाही, पण तुमच्या ब्लॅडरच्या आरोग्याची कल्पना घेण्यासाठी एक सोपा मार्ग आहे.
- दिवसभर पुरेसे पाणी प्या
- लघवी रोखून ठेवू नका
- सतत खूप कमी किंवा खूप जास्त वेळ लागत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या
- 21 सेकंद नियम तुमच्या शरीराचा छोटा पण महत्त्वाचा आरोग्य संकेत देतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.