जाहिरात

Snake Bite First Aid: साप चावल्यावर सर्वात आधी काय करावं? 'हा' सोपा उपाय करायला अजिबात विसरू नका!

Snake Bite Precaution : सापाचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते.सर्पदंश झाल्यावर जीव धोक्यात येतो. कोणता उपाय करावा?

Snake Bite First Aid:  साप चावल्यावर सर्वात आधी काय करावं? 'हा' सोपा उपाय करायला अजिबात विसरू नका!
Snake Bite First Aid
मुंबई:

What To Do After Snake Bite : सापाचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते.सर्पदंश झाल्यावर जीव धोक्यात येतो. साप चावल्यावर भीती वाटणं स्वाभाविकच आहे. पण अनेकदा साप चावण्यापेक्षा जास्त धोकादायक आपली घाबराट आणि चुकीचा उपचार ठरतो. पण घाबरण्याची आवश्यकता नाही. साप चावल्यावर सर्वात आधी काय करावे? याचा सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहोत. साप चावल्यावर कोणत्या गोष्टींपासून दूर राहावं? काय करावे आणि काय करू नये? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

घरगुती उपाय आणि मांत्रिकापासून दूर राहा

जर कोणाला साप चावला असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा – घरगुती उपाय,औषधी वनस्पती त्या जागेवर लावा. मांत्रिकाकडे जाऊन वेळ घालवणे जीवघेणे ठरू शकते. 

ताबडतोब रुग्णालयात पोहोचा

साप चावल्यानंतर तुमचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे एक क्षणही न घालवता रुग्णाला जवळच्या अँटी-वेनम असलेल्या रुग्णालयात पोहोचवणे. उपचारात विलंब म्हणजे धोका ओढवून घेणे. लक्षात ठेवा, सापाच्या विषावर एकमेव आणि 100% यशस्वी उपचार म्हणजे अँटी-वेनम (Anti-venom) इंजेक्शन,जे फक्त सरकारी किंवा चांगल्या खाजगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध असते.

घाबरू नका

विष फक्त तेव्हाच लवकर पसरते जेव्हा हृदयाची धडधड वाढते. रुग्णाला धीर द्या आणि स्वतःही शांत राहा.

नक्की वाचा >> 30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल

जखम स्थिर ठेवा

ज्या अवयवावर सापाने चावले आहे,तो जास्त हलवू नका. शक्य असल्यास एखाद्या कपड्याच्या किंवा पट्टीच्या मदतीने त्या अवयवाला बांधून स्थिर (Immobilize) करा, जेणेकरून विष पसरू नये.

दागिने काढा

चावलेल्या अवयवाला सूज येऊ शकते. त्यामुळे लगेच त्या जागेवरून अंगठी, बांगडी, घड्याळ, पैंजण यांसारख्या घट्ट वस्तू काढून टाका.
जखम स्वच्छ करा. चावलेल्या जागेला साबण आणि पाण्याने धुवा.

साप चावल्यावर या चुका कधीही करू नका

या गोष्टी लोक नेहमी करतात आणि त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येतो.

नक्की वाचा >> GK News: हायवेवर कोणत्या लेनवर सर्वात जास्त वेगाने गाडी चालवू शकता?, 'Golden Rules' बाबत अनेकांना माहितच नाही

जखमेवर ब्लेड फिरवू नका

जखम ब्लेड किंवा चाकूने कापण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे इन्फेक्शन आणि रक्तस्त्राव होऊ शकतो.

विष चोखू नका

तोंडाने विष चोखण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणा आहे. हे विष तुमच्या तोंडात किंवा पोटात जाऊन तुम्हालाही नुकसान करू शकते.

जखम गच्च बांधू नका

जखमेवर घट्ट पट्टी (टाइट टूर्निकेट) किंवा दोरी बांधू नका. यामुळे त्या अवयवात रक्तप्रवाह थांबतो, टिश्यू मरू शकतात आणि अवयव कापावा (Amputate) लागू शकतो.

बर्फ किंवा रसायन लावू नका

जखमेवर बर्फ, मिट्टीचे तेल किंवा कोणतेही रसायन लावू नका.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com