Drink Water After Tea Or Before Tea : अनेकांना चहा-कॉफी पिण्याचं प्रचंड व्यसन असतं. काही लोक दिवसभरात तीन ते चारवेळा चहा पितात. पण याचदरम्यान लोकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. तो म्हणजे चहा पिण्याच्या आधी पाणी प्यावं की चहा प्यायल्यानंतर पाणी पिणं योग्य?, खरंतर चहा आणि कॉफी शरीराला डिहायड्रेट करते. अशातच पाणी पिणं आवश्यक आहे. पण पाणी नेमकं कधी प्यावं? याबाबत अनेक लोकांचा गोंधळ उडतो. पण एक्स्पर्ट काय सांगतात..जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
तज्ज्ञांनी काय सांगितलं?
याविषयी डेंटिस्ट आणि अम्प्लांटोलॉजिस्ट डॉक्टर उपासना गोसालिया यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलंय की, तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याच्या आधीही पाणी पिऊ शकता. तसच चहा प्यायल्यानंतरही तुम्ही पाण्याचं सेवन करू शकता. पण विशेषत: चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर पाणी पिणं खूप आवश्यक असतं. अशामुळे आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकत नाहीत.
चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर पाणी का प्यावं?
शरीरी हायड्रेटेड राहतं
डॉक्टर उपासना यांनी म्हटलंय की, चहा आणि कॉफीत कॅफिन असतं. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमी म्हणजेच डिहायड्रेशन निर्माण करतं. जेव्हा तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर पाण्याचं सेवन करता, तेव्हा शरीर पुन्हा हायड्रेटेड राहतं. यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस अक्टिव्ह आणि एनर्जेटिक राहता.
नक्की वाचा >> भावासह 3 बहिणींचे न्यूड फोटो अन् व्हिडीओ बनवले..WhatsApp वर पाठवले, मोबाईल पाहताच तरुणाने स्वत:ला संपवलं!
दातांवर डाग लागत नाहीत
चहा किंवा कॉफी प्यायल्याने दातांवर पिवळे डाग निर्माण होतात. यामध्ये असलेलं कॅफिन आणि टॅनिन दातांच्या वरच्या भागावर जमा होते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर पाणी प्यायले, तर अशाप्रकारची समस्या उद्धवत नाही. पाणी प्यायल्याने दात पुन्हा स्वच्छ होतात आणि त्यावर डागही निर्माण होत नाहीत.
अॅसिडिटीची समस्येपासून होते सुटका
चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर लोक अॅसिडिटीच्या समस्येनं त्रस्त होतात. चहा आणि कॉफी दोन्हीमध्ये अम्लीय (Acidic) असतं. अशातच रिकाम्या पोटी चहा-कॉफीचं जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ किंवा अॅसिडिटी निर्माण होऊ शकते. पण जर तुम्ही त्यानंतरही पाणी प्यायले, तर यामुळे पोटातील अॅसिडिटी संतुलित राहते आणि जळजळही होत नाही.
नक्की वाचा >> Video: 15 फुटांचा किंग कोब्रा गंगा नदीच्या किनारी आला अन् फणा काढला, आंघोळीला गेलेले लोक सैरावैरा पळाले अन्...
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.