Vastu Tips : जर तुम्हाला आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा कोणत्याही चांगल्या कार्यात विलंब होत असेल तर घरात काही विशिष्ट चित्रे लावल्याने समृद्धी आणि सकारात्मकता येते असं मानलं जातं. वास्तूतज्ज्ञांच्या मते चार विशिष्ट प्रतिमा घरात लावल्याने जीवनात प्रगती आणि शांतत येऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार ही पाच चित्रं घरात लावणं शुभ मानली जातात...
1 सात पांढऱ्या घोड्यांचे चित्र...
सात घोड्यांचं चित्र घरात लावल्यामुळे घरात समृद्धी आणि संपत्ती येते असं म्हटलं जातं. हा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं. हे सात धावणारे घोडे शक्ती आणि चैतन्य दर्शवितात. म्हणून हे शुभ मानले जाते. मात्र हे चित्र तुमच्या घरात लावताना काही नियमांचे पालन करावे लागते.
2 उत्तर दिशेला वाहत्या धबधब्याचं चित्र...
वास्तूशास्त्रानुसार, चांदीच्या चौकटीतील वाहत्या धबधब्याचं चित्र घरात बसवणं फायदेशीर असतं. हे चित्र उत्तर दिशेला लावणं चांगलं मानलं जातं. हे चित्र घरात येणाऱ्या संपत्तीचा प्रवाह वाढवते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते.
नक्की वाचा - Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका
3 भगवान धन्वंतरी यांचं चित्र...
पश्चिम दिशेने अमृतकलश घेतलेली भगवान धन्वंतरी यांची प्रतिमा घरात ठेवणं शुभ मानलं जातं. वास्तूनुसार, हे चित्र कामात यश मिळविण्यास आणि आरोग्य सुधारण्यात मदत होते.
4 फळं देणाऱ्या झाडांचे चित्र...
हिरवगार झाडं आणि त्याला लगडलेली फळं असं चित्र लावल्यास समृद्धी वाढते. वास्तूशास्त्रानुसार, घरात दिसेल अशा ठिकाणी असं चित्र ठेवल्यास नातेसंबंध मजबूत राहतं, नेटवर्किंग वाढतं आणि तणाव कमी होतो. ही प्रतिमा सकारात्मकतेचं प्रतीकदेखील आहे.
5 भगवान हनुमानाचे चित्र...
आयुष्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि अंतर्गत शक्ती वाढविण्यासाठी भगवान हनुमानाचं शांत मुद्रेत असलेलं चित्र आग्नेय दिशेला लावावेत. वास्तूतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे धैर्य वाढते आत्मविश्वास बळावतो. आणि जीवनातील अडचणी हळूहळू दूर होण्यास मदत होते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)