White Hair Home Remedies: केस पांढरे होणे हे तुमच्या शरीरातील आतील पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे संकेत आहेत. योग्य आहार, योग्य उपचार केल्यास शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल. डॉक्टर रुचा पै यांनी सोशल मीडियावर पांढऱ्या केसांच्या समस्येबाबत माहिती सांगणारी पोस्ट शेअर केलीय. नेमकी काय माहिती दिलीय, जाणून घेऊया...
डॉक्टर रुचा पै यांनी सांगितले की, आयुर्वेद ग्रंथानुसार पालित्य म्हणजे केस अकाली पांढरे होणं, या समस्येवर सांगितलेला उपाय खालील प्रमाणे...
- दोन आवळा
- दोन हिरडा
- एक बेहडा
- आंब्याच्या पाच सुक्या कोय
- एक तोळा लोखंडाचे चूर्ण
- सर्व सामग्रीचे बारीक चूर्ण करून रात्रभर लोखंडाच्या भांड्यात ठेवावे.
केसांच्या मुळांवर लावण्यासाठी लेप कसा तयार करावा?
रात्रभर लोखंडाच्या भांड्यात ठेवलेले चूर्ण सकाळी व्यवस्थित एकजीव करा.
त्यामध्ये आवश्यकतेनुसार आवळ्याचा रस आणि कढीपत्त्याचा रस मिक्स करुन जाडसर लेप तयार करावा.
लेप कसा लावावा?
- टाळूची जागा स्वच्छ करावी.
- केसांच्या मुळांवर लेप लावा आणि हलक्या हाताने मसाज करावा.
- लेप लावल्यानंतर 30-40 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. त्याच दिवशी शॅम्पू लावणं टाळावे.
- हा उपाय केल्यास पित्तशमन आणि रक्तपोषण होते, केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Homemade Face Glowing Cream: चेहऱ्यावर हीरोइनसारखी चमक कशी येईल? झटपट घरातच तयार करा क्रीम, ग्लो येईल पटापट)
कोणती काळजी घ्यावी?- डोळ्यांमध्ये लेप जाऊ देऊ नका.
- फार उष्णता, डोके गरम झाल्यासारखे वाटत असल्यास प्रमाण कमी करावे.
- गर्भवती महिला तसेच एखाद्या आजाराचा सामना करत असाल तर लेप वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(नक्की वाचा: Reels Side Effects: आणखी एक Reel आणि सर्वच संपलं! तुमचा मेंदू होतोय गुलाम, क्षणभराचा आनंद ठरेल प्रचंड घातक)
आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?- आवळा आणि मध
- आवळा कँडी, आवळा चटणी
- रोज एक चमचा गाईच्या तुपाचे सेवन करावे.
- फळं: आंबा, पेरू, चिकू
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)