Reels Side Effects In Marathi: डिजिटल युगामध्ये हल्ली सर्वजण लॅपटॉप, मोबाइल यासारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे कळत-नकळत तुम्हाला बऱ्याच वाईट गोष्टींचीही सवय लागू शकते. वरवर पाहता तुम्हाला त्या सवयी किरकोळ वाटू शकतात, त्याचा कोणताही मोठा धोका नाही, असे समज-गैरसमज होऊ शकतात. पण याच सवयी तुमच्या मेंदूला गुलाम करतायेत. लहानांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वजण मोबाइलमध्ये सतत रील्स पाहत असतात. यामुळे तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर, स्मरणशक्तीवर आणि मानसिक आरोग्यावर थेट आघात होतोय. काही लोक रात्री झोपण्याच्या वेळेस फक्त रील्स पाहतात, झोप आवरून सलग काही तास व्हिडीओ पाहिले जातात. पहाट कधी होते हे देखील लोकांना कळत नाही. स्क्रोलिंग आणि व्हिडीओ पाहण्याच्या सवयीमुळे तुम्ही गजनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रील्स पाहण्याच्या सवयीमुळे मेंदूवर नेमके काय परिणाम होतात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
तुमचा मेंदू बनतोय रील्सचा गुलाम
रील्स पाहण्याच्या सवयीची भयंकर किंमत तुमचा मेंदू चुकवतोय. होय! जर तुम्ही दररोज तास-न्-तास रील्स स्क्रोल करत असाल, तर हीच सवय तुम्हाला हळूहळू गजनी बनवू शकते. ही सवय तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरतेय. सतत रील्स किंवा शॉर्ट व्हिडीओ पाहणं तुमच्यासाठी घातक ठरू शकते. मोबाइलची स्क्रीन आपण जितकी स्क्रोल करतो तेवढीच आपल्या मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य कमकुवत होत जातं. जेव्हा आपण मोबाइल स्क्रीन स्क्रोल करतो तेव्हा एक छोटीशी डोपामाइन किक मिळते. डोपामाइन हे तेच रसायन आहे जे आपल्याला चांगलं वाटेल, असं काम वारंवार करण्यास प्रवृत्त करतं. एकूणच डोमापाइनमुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत मिळते. पण या छोट्या-छोट्या आनंदाच्या लाटेनंतर मेंदूची गती तितक्याच वेगाने कमी होत जाते. यामुळे तीव्र स्वरुपात थकवा, सुस्ती आणि मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Photo Credit: NDTV Marathi
रील्सच्या व्यसनाचे दुष्परिणाम
- इच्छा असूनही रील स्क्रोल करणं थांबवू शकत नाहीत.
- मुलं, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तीनही वयोगटांवर एकसारखाच परिणाम होतो.
- जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन स्क्रोल करत राहणं आरोग्यासाठी घातक ठरेल.
मोबाइल सातत्याने वापरणं, तपासणं यामुळे झोपेवर परिणाम होतात. परिणामी चिडचिड वाढणे, लक्ष केंद्रित करताना अडथळे निर्माण होणे इत्यादी लक्षणं आढळली तरी सावध व्हा. कारण रील्सचा अतिरेक मेंदूला गुलाम बनवतोय.
(नक्की वाचा: Why Do You Yawn: दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई का येते? या 4 गोष्टी 99% लोकांना माहितीही नसतील)
रिल्सची सवय मेंदूसाठी घातक- स्मरणशक्ती कमी होते
- एकाग्रता क्षमता कमी होते
- मानसिक ताण वाढतो
- अपुरी झोप
- चिडचिडेपणा वाढणे
रील्स पाहताना मेंदूला सतत डोपामिन मिळते, ज्यामुळे रील्स पाहण्याचं व्यसन लागतं. मोबाइल सतत स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूची एकाग्रता क्षमता कमी होते. रात्री उशीरापर्यंत मोबाइलचा वापर वाढतो, त्याचा परिणाम झोपेवर होतो. अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी कामावरही परिणाम होतात.
(नक्की वाचा: Dry Cough Remedies: सिरप संपलंय? खोकलाही कमी होत नाही? तज्ज्ञांनी सांगितलेले 10 घरगुती उपाय वाचा)
रील्स पाहण्याच्या सवयीपासून कशी सुटका मिळवावी?- मोबाइल पाहताना दर तासाला ब्रेक घ्या
- मोबाइल वापरावर मर्यादा ठेवा.
- व्यायाम, ध्यानधारण करण्यावर भर द्या.
रील्स पाहणं मनोरंजनासाठी ठीक आहेत, मात्र त्याचा अतिरेक तुमच्या मेंदूला गुलाम बनवतो. मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोबाइल वापरावर मर्यादा ठेवा, रील्सचा गुलाम होऊ नका ब्रेक घ्या आणि डिजिटल डिटॉक्स करा.
तुमचा मेंदू बनतोय रील्सचा गुलाम, 'बस आणखी व्हिडीओ बनतोय' तुमच्या मेंदूसाठी घातक । NDTV Special News
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

