Health Tips : भूक लागली मूड बिघडू लागतो, चिडचिड होत हे अनेकांना जाणवतं. मात्र भूक लागणे राग येण्यासाठी निमित्त नाही तर शरीराची प्रतिक्रिया आहे. ज्याला विज्ञानात “हँगरी” (Hungry + Angry) म्हणतात. जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा राग लवकर येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करावे हे जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही बराच वेळ काहीही खात नाही तेव्हा तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते. ही साखर तुमच्या मेंदूला आणि शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. त्याची पातळी कमी होताच मेंदूवर ताण येतो आणि तुमचा मूड चिडचिडा होतो. यामुळेच भूक लागल्यावर तुम्हाला लवकर राग येतो. अशात तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.
(नक्की वाचा- वयाच्या चाळीशीत दिसाल 25 वर्षांचे; डॉक्टर म्हणतात, पाणी पिण्याच्या या 4 सवयी आताच बदला!)
शरीरात कोणते बदल होतात?
भूक लागल्यानंतर चिडचिड वाढते, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे. डोकेदुखी किंवा थकवा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे, झोपेचा परिणाम मूडवर दिसू लागतो. हे सर्व संकेत सूचित करतात की तुमच्या शरीराला आता अन्नाची गरज आहे. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर हळूहळू तुमची सवय बिघडते आणि मूड बिघडत राहतो.
जेवण वेळेत करा
नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमचा दिवस रिकाम्या पोटी सुरू केला तर तुम्हाला संपूर्ण दिवस थकवा जाणवेल आणि तुम्हाला लवकर राग येईल.
योग्य गोष्टी खा
प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्याची सवय लावा, जसे की फळे, डाळी, अंकुरलेले धान्य किंवा सुकामेवा. या गोष्टी पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करतात.
(नक्की वाचा - Explainer : ओव्हरवेट, अंडरवेट की लठ्ठ, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता? संपूर्ण गणित समजून घ्या, कुठे चूक करताय का?)
पाणी पित रहा
बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की आपल्याला भूक लागली आहे, परंतु प्रत्यक्षात आपले शरीर फक्त डिहायड्रेटेड असते. कमी पाणी पिल्याने मूडवरही परिणाम होतो.
चांगली झोप घ्या
झोपेचा अभाव तुमच्या मनाला विश्रांती घेऊ देत नाही. आणि जेव्हा मन थकलेले असते तेव्हा ते अन्नाच्या कमतरतेला अधिक नकारात्मक पद्धतीने घेते.