जाहिरात

वयाच्या चाळीशीत दिसाल 25 वर्षांचे; डॉक्टर म्हणतात, पाणी पिण्याच्या या 4 सवयी आताच बदला!

वय वाढत असलं तरी कायम तरूण दिसावं, चेहऱ्यावर ग्लो असावा अशी अनेकांची इच्छा असते. जर तुमचीही अशी इच्छा असेल तर पाणी पिण्याचे हे चार नियम फॉलो करण्यास सुरुवात करा.

वयाच्या चाळीशीत दिसाल 25 वर्षांचे; डॉक्टर म्हणतात, पाणी पिण्याच्या या 4 सवयी आताच बदला!

Daily water rules for youthfulness: वय वाढत असलं तरी कायम तरूण दिसावं, चेहऱ्यावर ग्लो असावा अशी अनेकांची इच्छा असते. जर तुमचीही अशी इच्छा असेल तर पाणी पिण्याचे हे चार नियम फॉलो करण्यास सुरुवात करा. पाणी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र केवळ पाणी पिणं पुरेसं नाही (How to drink water to reduce aging signs and improve gut health). पाणी कधी पिता, किती पिता या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. सायकोलॉजिस्ट आणि हिलिंग तज्ज्ञ डॉ. मदन मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पाणी पिण्याचे चार नियम सांगितले आहेत. हे चार नियम फॉलो केल्याने तुमचा चेहरा कायम ताजातवाना दिसेल. (Natural way to stay young using correct water drinking practices)  आणि चाळीशीतदेखील तुम्ही 25 वर्षांचे दिसाल. जाणून घेऊया काय आहेत ते चार नियम... 

पाणी पिण्याची योग्य पद्धत...

दिवसाची सुरुवात पाणी पिण्यापासून करावी (Start day with water)

डॉ. मोदी यांनी सांगितलं की, सकाळी उठताच सर्वात आधी कमीत कमी एक ग्लास पाणी नक्की प्या. हे केवळ बॉडी डिटॉक्स करीत नाही तर झोपेमुळे संथ झालेलं मेटॉबॉलिजम अॅक्टिव्ह करतं. सकाळी पाणी प्यायल्याने तुमचं लिव्हर, किडनी आणि त्वचा रिफ्रेश होते. यातून अॅसिडिटी, अपचनसारख्या समस्यांतून दूर राहू शकाल. हवं असेल तर कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे पोट आणि त्वचा दोन्हीला फायदा मिळतो. 

एक एक घोट पाणी प्या..(Drink water sip by sip)

डॉ. मोदी यांनी सांगितलं की, एका झटक्यात ग्लासभर पाणी पिण्यापेक्षा आरामात एक एक घोट करीत, तोंडात काही सेकंद घोळवत पाणी प्या. यामुळे जास्त प्रमाणात लाळ पोटात जाईल. यातून पचनक्रिया सुधारेल. यातून मायग्रेन आणि डोकेदुखीसारख्या त्रासातून सुटका मिळू शकेल. याशिवाय ईएनटी म्हणजेच कान, नाक, घसाचं आरोग्य सुधारेल. ही प्रक्रिया तुमच्या शरीरात नैसर्गिक व्यायमाप्रमाणे काम करते. 

थंड पाणी पिणं टाळा...(Avoid drinking cold water)

उन्हाळ्यात थंड पाणी कितीही आवडत असलं फ्रिजमधील थंड पाणी पिणं टाळा. थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या पचनक्रियेला फटका बसू शकतो आणि मेटाबॉलिजम स्लो होतो. याऐवजी मातीच्या माठातील ताजं पाणी सर्वात चांगला पर्याय आहे. यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं आणि नैसर्गिक पद्धतीने शरीर थंड राहतं. 

खाण्याच्या आधी किंवा नंतर पाणी पिणं टाळा...(Avoid water before and after meals)

Explainer : ओव्हरवेट, अंडरवेट की लठ्ठ, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता? संपूर्ण गणित समजून घ्या, कुठे चूक करताय का?

नक्की वाचा - Explainer : ओव्हरवेट, अंडरवेट की लठ्ठ, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता? संपूर्ण गणित समजून घ्या, कुठे चूक करताय का?

डॉ. मोदी यांनी पाणी पिण्याचा चौथा नियम सांगितला आहे. ते म्हणाले जेवणाच्या अगदी पूर्वीच किंवा जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. यातून पचनप्रक्रिया कमकुवत होते आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जेवण्याच्या 30 मिनिटांपूर्वी आणि 30 मिनिटांनंतर पाणी प्या. उभं राहू कधीही पाणी पिऊ नका. नेहमी बसून पाणी प्यायला हवं. जेवल्यानंतर अगदीच गरज असेल तर दूध, मठ्ठा, दही, ताक घेऊ शकता. हे पदार्थ पचनासाठी मदत करतात. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com