​वयाच्या 40 शीनंतर पक्के मित्र का दुरावतात? वाचा खरी कारणे, तुम्ही ही म्हणाल, खरोखर असं असतं का?

मग मित्रांना भेटणे तर लांबचीच गोष्ट राहते. तिथूनच खऱ्या अर्थाने प्रत्येकाचे रस्ते हे वेगळे होत जातात.

जाहिरात
Read Time: 2 mins

वयाची ४०शी पार केल्यानंतर माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यात ही एक असा टप्पा येतो, जिथे तो दोन जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहात फसतो. त्यातून बाहेर कसे पडायचे याचेच गणित सोडवण्यात त्याचा बराचसा वेळ जातो. यालाच मानसशास्त्रात 'सँडविच जनरेशन' म्हटले जातो. या वयात एका बाजूला मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या करिअरची चिंता प्रत्येकाला असते. तर दुसऱ्या बाजूला वृद्ध माता-पित्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही त्याच्यावरच असते. या कौटुंबिक आणि सामाजिक ओझ्याखाली कोणती ही व्यक्ती दबते.  त्यातून  स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. अशा परिस्थितीत मित्रांसोबत घालवलेला वेळ हा प्राधान्यक्रमाच्या यादीत खूप मागे पडतो.

चाळीस वर्षांनंतर प्रत्येक मित्राच्या आयुष्याचा मार्ग बदलले आपण पहातो. त्यांचे जिवन पुर्ण पणे बदलले असते. कोणी परदेशात नोकरीसाठी जातो. काही वेळा तो तिकडेच स्थिरावतो.  तर कोणी अध्यात्माकडे वळतो. काहींचे लक्ष फिटनेसकड असते.  जेव्हा दोन मित्रांची जीवनशैली आणि विचारसरणी यात मोठा फरक पडतो, तेव्हा त्यांच्यातील संवादाचे 'कॉमन टॉपिक्स' संपतात. पूर्वी तासन्तास बोलणारे मित्र पुढे मात्र दुरावतात. ऐवढेच नाही तर आता आपआपसात काय बोलयचे असा त्यांना प्रश्न पडतो. याच कारणाने दोन मित्रांमध्ये अंतर निर्माण होते. 

Advertisement

नक्की वाचा - Pune Accident: स्कूल बसमध्ये 50 चिमुकले, मद्यधुंद चालक अन् काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, पाहा Video

या वयात व्यक्ती आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असतात. त्याच वेळी ते आपल्या कुटुंबाचा याकाळात जास्त विचार करतात. पद, पैसा आणि प्रतिष्ठा त्यांच्या वाट्याला येते. हे खरं असलं तरी त्यांच्याकडे नसतो तो वेळ.  कॉर्पोरेट क्षेत्र असो की अन्य कोणते ही क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी कामाचा ताण हा असतोच.  वाढता ताण आणि कामाचे तास यामुळे वीकेंड केवळ थकवा घालवण्यासाठी असं समिकरण बनून जातं. यासोबतच, वय वाढते तशी माणसाची 'सोशल एनर्जी' ही कमी होत असते. आता कोणालाही आयुष्यात ड्रामा नको असतो, तर हवी असते फक्त शांतता. यामुळे सोशल सर्कल स्वतःहून लहान होत जाते. केवळ सोशल मीडियावर 'HBD' लिहिण्यापुरतीच ही मैत्री मर्यादित राहते असा अनेकांना अनुभल येतो.

नक्की वाचा - Thane News: एकाच नंबरच्या दोन रिक्षा, बोकडामुळे मिळाली चोराला शिक्षा! एक चूक नडली अन् चोरीचा पर्दाफाश

"तू नाही आलास तर मी पण जाणार नाही," असं म्हणणारे आपले बालपणीचे मित्र अचानक कुठे हरवून जातात? वयाच्या चाळीशीत आल्यावर कळते की, आपण 'सँडविच' झालो आहोत. एका बाजूला लहान मुलांच्या शाळेची फी, त्यांचे भवितव्य आणि दुसरीकडे वृद्ध आई-वडिलांचे आजारपण, डॉक्टरांच्या फेऱ्या. घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये माणूस इतका व्यस्त होतो की, त्याला स्वतःचा श्वास घ्यायलाही सवड मिळत नाही. मग मित्रांना भेटणे तर लांबचीच गोष्ट राहते. तिथूनच खऱ्या अर्थाने प्रत्येकाचे रस्ते हे वेगळे होत जातात.