जाहिरात

Brown Period Blood: पीरियड्सपूर्वी तपकिरी रंगाचं रक्त येतं का? गंभीर की सामान्य लक्षण? शरीर कशाचं देतंय संकेत

Brown Period Blood: पीरियड्सदरम्यान तपकिरी (ब्राउन) रंगाचे रक्त का येते? हे धोकादायक आहे की सामान्य? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Brown Period Blood: पीरियड्सपूर्वी तपकिरी रंगाचं रक्त येतं का? गंभीर की सामान्य लक्षण? शरीर कशाचं देतंय संकेत
"Brown Period Blood: मासिक पाळीपूर्वी तपकिरी रंगाचा स्त्राव होतो का?"
Canva

Brown Period Blood: अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान किंवा त्याआधीच थोड्याथोड्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. सामान्यतः मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटच्या दिवसात असे घडते. तुम्हीही कधी याचा अनुभव घेतला आहे का? असे घडल्यानंतर बहुतांश वेळेस अनेकींच्या मनात प्रश्न येतो की मी निरोगी आहे का? हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे का? हे सुरक्षित आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला जाणून घेऊया मासिक पाळीचे रक्त तपकिरी रंगाचे का असते आणि ते कशाचे संकेत आहेत.

सहसा मासिक पाळीचे रक्त लाल किंवा गुलाबी रंगाचे असते. पण कधीकधी ते तपकिरी रंगाचेही दिसते. खरं तर यात काळजी करण्याचे काहीच कारण नसते, कारण हे केवळ 'जुन्या रक्ताचे' लक्षण आहे. हे रक्त शरीराबाहेर पडण्यास जास्त वेळ लागल्यामुळे हवेच्या संपर्कात येऊन त्याचे 'ऑक्सिडेशन' (Oxidize) होते. पण या तपकिरी रक्तासोबत इतर काही लक्षणे दिसल्यास काळजी घेण्यासह डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा: Mumbai High Court: वय पन्नाशी पार, तरीही आई होण्याची इच्छा, मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं? वाचा संपूर्ण प्रकरण)

तपकिरी रक्ताचे कारण काय?

मासिक पाळीच्या रक्ताचा तपकिरी रंग मुख्यतः ऑक्सिडेशन या नैसर्गिक प्रक्रियेमुळे येतो. जेव्हा रक्ताला शरीराबाहेर पडण्यासाठी जास्त वेळ लागतो, तेव्हा ते ऑक्सिजनच्या संपर्कात येते आणि त्याचा गडद लाल रंग तपकिरी रंगात बदलतो. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी येणारे तपकिरी रक्ताचे डाग पूर्णपणे सामान्य आहेत आणि ते जुने रक्त बाहेर पडत असल्याचे निदर्शक आहे. हे सहसा मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी दिसते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

डॉक्टरांना कधी भेटावे?

कधीकधी तपकिरी रंगाचे रक्त डिस्चार्ज काही वैद्यकीय समस्यांकडे इशारा करतो, जसे की यीस्ट इन्फेक्शन, लैंगिक संक्रमित संसर्ग (STI), गर्भाशय ग्रीवा किंवा योनीमार्गाची सूज आणि खूप दुर्मीळ प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्वायकल कॅन्सर). त्यामुळे जरी हे सहसा घातक नसले तरी इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 

(नक्की वाचा: Homemade Limbu Pani Recipe: लिंबू पाणी बनवताना करताय ही चूक? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी)

खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे नक्की जा:

  • डिस्चार्जला तीव्र किंवा विचित्र दुर्गंधी येणे 
  • पोटाच्या खालच्या भागात सतत दुखणे
  • प्रायव्हेट पार्टमध्ये तीव्र खाज किंवा जळजळ होणे 
  • जर मासिक पाळीचे चक्र अचानक बदलले असेल किंवा अनियमित झाले असेल आणि तपकिरी डाग दिसत असतील.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com