जाहिरात

Holi Special: नवी नवरी लग्नानंतरची पहिली होळी सासरी का साजरी करत नाही? अनेक जावयांना खास कारणं माहितच नाहीत

लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या होळीशी संबंधित एक विशेष परंपरा खूप प्रसिद्ध आहे. नववधू पहिली होळी सासरी नाही, तर माहेरी जाऊन साजरी करते. असे का केले जाते? ही फक्त एक परंपरा आहे की यामागे काही खास कारण देखील आहे? जाणू घ्या सविस्तर माहिती.

Holi Special:  नवी नवरी लग्नानंतरची पहिली होळी सासरी का साजरी करत नाही? अनेक जावयांना खास कारणं माहितच नाहीत
Holi Myths And Facts

1st Holi After Marriage Traditions : भारतीय सण फक्त उत्सव नसतात, तर ते रुढी परंपरांचे सुंदर संगमही असतात. होळी म्हणजे फक्त गोडधोड खाणे आणि रंग खेळणे एवढेच नाही, तर अनेक रुढी-परंपरांचा त्यात समावेश असतो. तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून अनेकदा होळीच्या परंपरेबाबत ऐकलं असेल. पहिली होळी सासरी साजरी केली जात नाही, असं काही लोक सांगतात. होय, लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या होळीशी संबंधित एक विशेष परंपरा खूप प्रसिद्ध आहे. नववधू पहिली होळी सासरी नाही, तर माहेरी जाऊन साजरी करते. असे का केले जाते? ही फक्त एक परंपरा आहे की यामागे काही खास कारण देखील आहे? जाणू घ्या सविस्तर माहिती.

पहिली होळी सासरीच का साजरी केली जात नाही?

घरातील वडीलधाऱ्यांच्या मतांनुसार आणि पारंपरिक विश्वासानुसार, लग्नानंतरच्या पहिल्या होळीच्या दिवशी सून आणि सासू यांनी एकत्र जळणाऱ्या होलिकेची अग्नी पाहणे शुभ मानले जात नाही. नवविवाहित महिलांसाठी होलिका दहन पाहणे अशुभ मानले जाते. यामागे आणखी एक कारण सांगितले जाते. होलिका दहनाला 'होलिकेची चिता' असेही म्हणतात.
म्हणूनच, लग्नासारख्या मंगलकार्यानंतर लगेच सासरी राहून ही चिता जळताना पाहणे शुभ मानले जात नाही.

1. सास–सुनेचे नाते

मान्यतेनुसार, होलिकेची अग्नी अत्यंत प्रखर मानली जाते. परंपरेप्रमाणे नवीन सून आणि सासू यांनी ही अग्नी एकत्र पाहू नये, कारण असे मानले जाते की यामुळे त्यांच्या नात्यात कटुता किंवा वाद निर्माण होऊ शकतो. 

नक्की वाचा >> Instagram मुळे अख्ख्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्त्यावरच रक्तरंजित खेळ, अंगावर काटा आणणारी कहाणी

2. होणाऱ्या बाळाचे आरोग्य

जर नवीन नवरी गर्भवती असेल, तर होलिका दहनातील धूर आणि उष्णता तिच्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून तिला माहेरी राहिल्यास अधिक काळजी, आराम आणि सुरक्षित वातावरण मिळतं,असंही म्हटलं जातं.

3. नात्यांमध्ये जुळवून घेणे

अजून एक कारण असे मानले जाते की पहिली होळी माहेरी गेल्याने नववधूला आपल्या जुन्या वातावरणात थोडा वेळ घालवण्याची संधी मिळते, ज्यामुळे तिला मानसिकरीत्या आनंदी आणि आरामदायी वाटते. तसेच जावई जेव्हा सासरी जातो, तेव्हा तिथल्या लोकांशी त्याचे संबंध अधिक मजबूत होतात आणि कुटुंबीयांमध्ये आपुलकी वाढते.

नक्की वाचा >> T20 World Cup 2026 : भारताचा पराभव अन् विंडिजचा विजय..वर्ल्डकपमध्ये उलथापालथ, कोण कोण गाठणार सेमी फायनल?

लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जात असाल, तर ही आवश्यक वस्तू नक्की सोबत ठेवा

  • घरात वापरण्यासाठी आरामदायक कपडे
  • कुर्ती, plazo, टी-शर्ट, लेगिंग्ज किंवा कॉटनच्या साड्या.
  • बाहेर भेटायला जाण्यासाठी कपडे
  • मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना भेटायचे असल्यास, छान सूट किंवा साड्या सोबत पॅक करा.
  • स्किनकेअरची आवश्यक उत्पादने
  • फेसवॉश, मॉइस्चरायझर, सनस्क्रीन, कोल्ड क्रीम..या स्किनकेअरची मूलभूत वस्तू नक्की ठेवा.
  • औषधांचा साठा
  • ज्या औषधांची तुम्हाला गरज असते किंवा नियमितपणे घेता, ती नक्की सोबत ठेवा.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com