Morning Habits : सकाळी 5 वाजता उठणारे लोक अधिक आनंदी आणि यशस्वी का असतात? जाणून घ्या कारणं आणि फायदे

Morning Habits: दिवसाची सुरुवात लवकर केल्याने काय होते?

जाहिरात
Read Time: 2 mins
सकाळी उठण्याचे फायदे
File Photo

Wake up early in the morning : लहानपणापासून आई-वडील लवकर उठण्याचा सल्ला देतात. सकाळी लवकरच उठल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते आणि शरीर- मन उत्साही राहतं. मात्र यासाठी रात्री वेळेवर झोपणं आवश्यक आहे. सध्या धकधकीचं आयुष्य आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे लोक रात्री उशीरापर्यंत जागतात, त्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. परिणामी अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवतात. सध्याच्या काळात तर कमी वयातही हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका संभवतो. अशावेळी आपल्या आरोग्याकडे अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात केल्याने अनेक धोके टाळले जाऊ शकतात. अनेक प्रसिद्ध आणि नामांकित व्यक्ती सकाळी लवकर दिवसाची सुरुवात करीत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या यशाची आणि आनंदाची पाच कारणं तुम्हाला सांगणार आहोत. 

सकाळी ५ वाजता उठण्याचे फायदे

सकाळची वेळ सर्वात शांत मानली जाते. तुम्ही सर्वात महत्त्वाची आणि कठीण कामे कोणत्याही व्यत्ययाशिवाय या वेळात करू शकता. 

शरीर उत्साही राहतं

तुम्ही लवकर उठल्यावर शरीराच्य उर्जेची पातळी सर्वाधिक असते. ताज्या हवेत आणि शांत वातावरणात व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

मानसिक शांतता

ध्यान, योग किंवा प्राणायाम सारख्या व्यायाम प्रकारांसाठी  पहाटे ५ ही योग्य वेळ आहे. ज्यामुळे मन शांत आणि स्थिर राहतं. .

काम करण्यासाठी जास्त वेळ

सकाळी लवकर उठल्याने दिवस मोठा मिळतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामासाठी आणि वैयक्तिक जीवनासाठी अधिक वेळ मिळतो.

Advertisement

नक्की वाचा - Bad Morning Habits: झोपेतून उठल्या उठल्या 4 गोष्टी टाळा, अन्यथा अख्खा दिवस जाईल खराब

जगभरातील हे सेलिब्रिटी लवकर उठतात

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस अनेकदा लवकर उठतात. वेळ कधी कधी बदलते. 

डिझ्नीचे माजी सीईओ बॉब इगर कामासाठी पहाटे ४:३० वाजता उठतात.

स्पॅन्क्सच्या संस्थापक सारा ब्लेकली सकाळचा वेळ  कामासाठी वापरतात.

मार्क वॉलबर्ग, मिशेल ओबामा आणि जेनिफर लोपेझ सारख्या सेलिब्रिटी देखील सकाळी ५ वाजता उठतात.  त्याचप्रमाणे, भारतातील कित्येक सेलिब्रिटी देखील सकाळी ५ वाजता उठतात.

Advertisement