हिवाळ्यात तोंडातून धुरासारखी सफेद वाफ बाहेर का पडते? 99 टक्के लोकांना महितच नाही यामागचं कारण

हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला असून गुलाबी थंडीची चाहूल अनेकांना लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आपल्या तोंडातून धुरासारखी वाफ का बाहेर पडते? जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
Why Steam Comes Out of Mouth In Winter
मुंबई:

Winter Health Tips In Marathi : हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला असून गुलाबी थंडीची चाहूल अनेकांना लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना हुडहुडी भरली आहे. सकाळ-संध्याकाळच्या थंड वाऱ्यामुळे अनेकांचं शरीर थरथरतं आणि त्वचा कोरडी पडते. गरम उबदार कपडे घातल्यानंतरही थंडी जाणवते.याचबरोबर हिवाळ्यात असंही घडतं की,जेव्हा आपण श्वास सोडतो,तेव्हा तोंडातून धूर किंवा वाफ निघताना दिसते. अनेकांना प्रश्न पडतो की हे नेमके का होते आणि फक्त थंड हवामानातच का दिसते? या विज्ञानामागची खरी कारणे जाणून घेऊया. 

जेव्हा आपण श्वास घेतो,तेव्हा शरीरात ऑक्सिजन जातो आणि श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड बाहेर येतो.पण यासोबतच आपल्या श्वासात थोडीशी ओलसरता म्हणजेच वॉटर वेपरही असते.हिवाळ्यात बाहेरचे तापमान खूप कमी असते,त्यामुळेही गरम आणि ओलसर हवा बाहेर येऊन थंड हवेत मिसळते.यामुळे ही ओलसरता लहान-लहान पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते,जी आपल्याला धूर किंवा वाफेसारखी दिसते.

नक्की वाचा >>Beer Drinking Tips : एका महिन्यात किती वेळा बिअर प्यायली पाहिजे? आरोग्यासाठी कोणती बिअर चांगली?

थंडीच्या दिवसात कशामुळे निघते तोंडातू वाफ?

हिवाळ्यात शरीरात आणि श्वास घेण्याच्या प्रक्रियेत ओलसरता असते.ही ओलसरता जेव्हा थंड हवेशी मिळते,तेव्हा ती लगेचच कंडेन्स होऊन वाफेत बदलते.हीच प्रक्रिया आहे जशी थंड बाटलीवर पाण्याचे थेंब जमा होतात.म्हणूनच बाहेर खूप थंडी असताना आपला श्वासही दिसू लागतो.
अनेक लोकांना वाटतं की, हिवाळ्यात तोंडातून वाफ निघणे, म्हणजे शरीरात एखांद इन्फेक्शन किंवा फुफ्फुसाच्या समस्येचा संकेत आहे.पण असं अजिबात नाहीय.ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी पत्येक माणसात असते.तापमान कमी असल्याने तोंडातून निघालेली वाफ दिसू लागते. 

पाणी घन (बर्फ), द्रव (पाणी) आणि वायू (वाफ) या तीन रूपांत आढळते. हिवाळ्यात जेव्हा तापमान ७ डिग्री सेल्सियस किंवा त्याहून कमी होते, तेव्हा तोंडातून बाहेर पडणारी ही ओलसरता वायूच्या रूपात बाहेर येते आणि वाफेसारखी दिसते. जर तापमान आणखी कमी झाले, तर ही वाफ बर्फाच्या कणांमध्येही बदलू शकते. म्हणूनच खूप थंडी असताना श्वास सोडताना तोंडातून वाफ अधिक स्पष्ट दिसते.

Advertisement

नक्की वाचा >> Buttermilk: ताक 'या'आजारांसाठी रामबाण उपाय! ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोकांना माहितच नाही

या गोष्टींमुळे शरीराला मिळेल गरमी अन् राहाल फिट

हिवाळ्यात कोमट पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.
व्हिटॅमिन C आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील.
सकाळी व्यायाम किंवा योग नक्की करा, जेणेकरून शरीराचे तापमान सामान्य राहील.
लिप बाम, मॉइश्चरायझर आणि उबदार कपडे वापरा, जेणेकरून त्वचा आणि ओठ कोरडे पडणार नाहीत.