Chili Burn Remedies: जेवताना किंवा स्नॅक्स खाताना मिरची खाल्ल्यास तिखट लागलं तर बहुतांश लोक लगेच पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का, तिखट लागल्यानंतर तुम्ही पाणी पिऊन सर्वात मोठी चूक करत आहात. तज्ज्ञांच्या मते तिखट खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने जळजळ कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकते. विशेषतः मुलांच्या बाबतीत ही समस्या जास्त वाढू शकते. तिखट लागल्यानंतर पाणी प्यायल्यानंतरही त्वरित आराम का मिळत नाही? तसेच काय खाल्ले पाहिजे? जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...
मिरची तिखट का लागते?
मिरचीमधील तिखटपणा हा 'कॅप्सॅसिनॉइड्स' (capsaicinoids) नावाच्या कम्पाऊंड्सच्या (compounds) समूहामुळे असतो; या समूहात मिरचीच्या वेगवेगळ्या जातींमध्ये अनेक प्रकारची संयुगे आढळतात, पण 'व्हॅनिलॉइड' हे यातील सर्वात मुख्य कम्पाउंड 'कॅप्सॅसिन' (capsaicin) आहे. जेव्हा मिरची खाल्ली जाते, तेव्हा त्यातील कॅप्सॅसिनॉइड्स तोंडाच्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये (mucous membrane) असलेल्या एका रिसेप्टरशी जोडले जातात. त्यामुळे जिभेवर जळजळ होत असल्याची जाणीव होते.
(नक्की वाचा: Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेने त्रस्त? शाकाहारींसाठी वरदान ठरेल फक्त 'ही' 1 गोष्ट)
मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागल्यानंतर काय करावे?
- पाणी पिऊ नका.
- 1-2 चमचे दही खा.
- थोडे दूध प्या.
- दुधात असलेले फॅट्स (चरबीयुक्त घटक) कॅप्सॅसिन काढून टाकण्यास मदत करते.
- मुलांसाठीही हा उपाय लागू होतो.
- केवळ पाणी पिऊन जळजळ कमी करण्याचा प्रयत्न करू नका.
पाणी प्यायल्याने जळजळ का वाढते?
कॅप्सॅसिन हे एक प्रकारचे तेल असते. तेल आणि पाणी एकमेकांमध्ये मिसळत नसल्यामुळे पाणी प्यायल्याने हे तेल संपूर्ण तोंडात पसरते, ज्यामुळे मिरची जास्त तिखट लागते.
मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागल्यास काय करावे?
मिरची खाल्ल्यानंतर तोंडात जळजळ होऊ लागली तर पाण्याऐवजी दोन चमचे दूध किंवा एक चमचा दही खा. यामध्ये असलेले फॅट्स कॅप्सॅसिनला त्वरित काढून टाकेल आणि तोंडाची होणारी जळजळ शांत होईल. मुलांच्या बाबतीत या गोष्टीची विशेष काळजी घ्या.
(नक्की वाचा : Morning Routine Tips: रात्री 8 तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतो? सकाळी उठल्यानंतर 3 कामं करा, दिवसभर वाटेल फ्रेश)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world