Hair Growth Tips: काळे, चमकदार, दाट आणि लांबसडक केस कोणाला आवडत नाही? पण काही लोक असेही आहेत जे आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करून आणि केसांची नियमित काळजी घेऊनही केस वाढत नसल्यामुळे त्रस्त असतात. केस न वाढण्यामागील कारण काय? या विषयावर एनडीटीव्हीने हेअर ट्रान्सप्लांट, युजेनिक्स हेअर सायन्सेस'चे सह-संस्थापक डॉ. प्रदीप सेठी यांच्याशी संवाद साधला. ते गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. सेठी यांच्या मते केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि लांबसडक केसांसाठी फक्त हेल्दी डाएट पुरेसा नाही. तर तुमच्या शरीरात एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता असणे हे देखील कारण असू शकते.
डॉ. प्रदीप सेठी यांच्या मते केस न वाढण्यामागे तुमच्या शरीरात खालील व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते:
- व्हिटॅमिन D
- व्हिटॅमिन B12
- बायोटिन (Biotin)
1. व्हिटॅमिन 'डी'च्या कमतरतेमुळे काय होते? (Deficiency Of Vitamin D Causes)
डॉ. सेठी यांनी स्पष्ट केलंय की, व्हिटॅमिन डी नवीन 'हेअर फॉलिकल्स' (केसांची मुळे) तयार करण्यास मदत करते. अशा वेळी शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास केवळ केस गळत नाहीत, तर त्यांच्या वाढीवरही परिणाम होतो.
उपाय: शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढायची असेल, तर दररोज सकाळी काही वेळ उन्हात नक्की बसा आणि आपल्या आहारात मशरूम, टोफू, अंड्यातील पिवळा भाग आणि सी-फूड यासारख्या पदार्थांचा समावेश करा.
2. व्हिटॅमिन 'बी 12'च्या कमतरतेमुळे काय होते? (Vitamin B12 Deficiency)
डॉक्टरांच्या मते, हे व्हिटॅमिन अशा पेशी (Cells) तयार करण्यास मदत करते, ज्या केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे जेव्हा शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते, तेव्हा केसांना पुरेसे पोषण मिळत नाही, परिणामी केसांची वाढ मंदावते.
उपाय: शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, पालक, बीट आणि भाजलेले चणे यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.
(नक्की वाचा: Type 1 Diabetes In Children: टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांसाठी शाळा अन् प्रवास सुरक्षित कसा ठेवावा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला)
3. बायोटिनच्या कमतरतेमुळे काय होते? (What Happens Due To Biotin Deficiency?)
डॉक्टर सेठी यांच्या मते की, बायोटिनला 'हेअर व्हिटॅमिन' म्हटले जाते. ते 'केराटिन' नावाच्या प्रोटीनच्या (Protein) निर्मितीत मदत करते, ज्यामुळे केस मजबूत राहतात.
उपाय: अखंड धान्ये, सुकामेवा आणि बिया, अॅवोकॅडो, मासे, मशरूम, बाजरी, पालक, केळी, ब्रोकोली आणि रताळे यांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील बायोटिनची कमतरता दूर करू शकता.
(नक्की वाचा: Makhana Benefits: सलग 30 दिवस तुपात भाजलेले मखाणे खाल्ल्यास शरीरात काय घडले? डॉ. अवतार यांनी दिला 'हा' सल्ला)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)