जाहिरात

14 जूननंतर 10 वर्ष जुने अपडेट ने केलेले आधारकार्ड बंद होणार? फुकटात असं करा अपडेट

Update Aadhaar Card Online for Free: आधारकार्ड अपडेट करायचं असेल तर ती सुविधा UIDAI च्या पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही.

14 जूननंतर 10 वर्ष जुने अपडेट ने केलेले आधारकार्ड बंद होणार? फुकटात असं करा अपडेट
Aadhaar Card Update Online For Free
नई दिल्ली:

आधारकार्डबाबत अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूट्युब व्हिडीओ, शॉर्ट्स आणि इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून या बातम्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, आधारकार्ड 10 वर्षांपासून अपडेट केलं नसेल तर ते 14 जूननंतर ते निष्क्रिय होईल. त्यामुळे आधारकार्ड वापरता येणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या वृत्तात काहीही तथ्य नाही, त्यामुळे घाबरायची गरज नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने अनेकदा आधारकार्ड अपडेटबाबत सूचना केली आहे. त्यानुसार, 10 वर्षात तुम्ही आधारकार्ड अपडेट केलं नाही तर UIDAI कडून ते अपडेट करण्याची मोफत सुविधा केली जाते. तुम्ही 14 जूनपर्यंत UIDAI पोर्टलवर जाऊन आधारकार्ड अपडेट करु शकता.   

(नक्की वाचा - OpenAI ने लॉन्च केलं ChatGPT-4o व्हर्जन, यूजर्सना स्वस्तात मिळणार अधिक वेगवान आणि नवीन फीचर्स)

आधारकार्ड अपडेट करायचं असेल तर ती सुविधा UIDAI च्या पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही. मात्र ही सेवा केवळ UIDAI च्या पोर्टलवर उपलब्ध आहे. मात्र आधार केंद्रावर जाऊन तुम्ही आधारकार्ड अपडेट केलं तर त्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. 

(नक्की वाचा- AC Servicing At Home : तुम्ही घरातच करु शकता एसी सर्व्हिसिंग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो)

तुमचं आधारकार्ड देखील 10 वर्षात अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर ते करुन घ्या. कारण 14 जूननंतर त्यासाठीची डेडलाईन आहे. त्यानंतर तुम्हाला UIDAI च्या पोर्टलवर देखील पैसे भरावे लागणार आहेत.  UIDAI ने स्पष्ट केलं आहे की, 14 जूननंतर कोणतेही आधारकार्ड बंद होणार नाही. आधीसारखंच ते वापरता येणार आहे. केवळ 14 जूननंतर UIDAI कडून मिळणार मोफत सेवा बंद होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com