जाहिरात

New Rules 2024: सिलेंडर, CNG-PNG स्वस्त होणार की महाग?; 1 सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार?

Rule changes in September 2024: एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती 1 सप्टेंबर 2024 पासून बदलण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे वाहतूक खर्चावर, विशेषत: हवाई प्रवासासाठी परिणाम होऊ शकतो आणि वाढीव लॉजिस्टिक खर्चामुळे वस्तू आणि सेवांवर परिणाम होऊ शकतो.

New Rules 2024: सिलेंडर, CNG-PNG स्वस्त होणार की महाग?; 1 सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार?
New Rules From September 2024: सितंबर महीने में क्रेडिट कार्ड नियमों में बदलाव होने जा रहा है.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होतात. सप्टेंबर महिन्यात देखील असे अनेक नियम बदलणार आहेत, ज्याच्या तुमच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येईल. मोफत आधार अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीपासून ते स्पेशल एफडी स्कीम, क्रेडिट कार्डचे नियम या सर्वांचा समावेश आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून होणाऱ्या बदलाविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

मोफत आधार अपडेटसाठी अंतिम मुदत 

UIDAI ने (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आधारशी संबंधित सर्व तपशील मोफत अपडेट करण्याची सुविधा 3 महिन्यांपर्यंत वाढवली आहे. म्हणजे 14 जून ते 14 सप्टेंबर 2024 या कालावधीत तुम्हालाही या मोफत सेवेचा लाभ घेता येईल. त्यामुळे 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत तुमचे आधार ऑनलाइन अपडेट करता येईल. या कालावधीनंतर तुम्हाला यासाठी शुल्क भरावे लागतील. आधार सेवा केंद्राला भेट देऊन आधारमध्ये कोणतेही अपडेट करण्यासाठी तुम्हाला लागू शुल्क भरावे लागेल.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गॅस सिलेंडरची किंमत 

सरकार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करते. व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात दर महिन्याला बदल होताना दिसतो. सप्टेंबरमध्येही एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती.

ATF आणि CNG-PNG दरांमध्ये बदल

एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती 1 सप्टेंबर 2024 पासून बदलण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे वाहतूक खर्चावर, विशेषत: हवाई प्रवासासाठी परिणाम होऊ शकतो आणि वाढीव लॉजिस्टिक खर्चामुळे वस्तू आणि सेवांवर परिणाम होऊ शकतो.

(नक्की वाचा - ते थरारक 48 तास! पुराच्या पाण्यात अडकली भारतीय महिला क्रिकेटपटू, सुटकेसाठी काय केलं?)

फेक कॉल्सवर लगाम 

फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) 1 सप्टेंबर 2024 पासून नवीन नियम लागू करत आहे. ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. TRAI ने दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित डीएलटी म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत टेलीमार्केटिंग सेवा हळूहळू ब्लॉकचेन-आधारित प्रणालीकडे वळतील. यामुळे सुरक्षा वाढेल आणि फेक कॉल्स, मेसेज कमी होतील. हे पाऊल दूरसंचार फसवणुकीविरुद्ध एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे ग्राहकांना घोटाळ्यांपासून अधिक संरक्षण मिळेल.

नवीन क्रेडिट कार्ड नियम

सप्टेंबर महिन्यात क्रेडिट कार्डसंबंधीत रिवॉर्ड पॉइंट्स आणि पेमेंट शेड्यूलच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. HDFC बँक युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मर्यादा निश्चित करेल. म्हणजेच ग्राहकांना वीज किंवा पाणी यासारख्या सेवांसाठी पैसे भरताना कमी रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात.

याव्यतिरिक्त, IDFC फर्स्ट बँक त्यांचे पेमेंट शेड्यूल अपडेट करत आहे. ज्याचा पेमेंट केव्हा आणि कसे प्रक्रिया केली जाते यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी रिवॉर्ड पॉइंट गमावू नयेत किंवा कोणत्याही शुल्काचा सामना करू नये म्हणून हे बदल महत्त्वाचे आहेत.

(नक्की वाचा -  Parenting Tips : मुलांच्या सुरक्षित, सुखकर भविष्यासाठी या टिप्स करा फॉलो)

महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ मिळू शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे. म्हणजेच पुढील महिन्यापासून डीए 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com