Winter Health Tips: थंडीत सांधे का दुखतात? Joint Pain कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले रामबाण उपाय

Winter Health Tips: हिवाळ्यामध्ये सांधेदुखीच्या समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. सांध्यांच्या दुखण्यातून सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया काही उपाय....

जाहिरात
Read Time: 2 mins
"Winter Health News: थंडीमध्ये सांध्यांच्या दुखण्यातून सुटका कशी मिळवावी?"
Canva

Winter Health Tips: हिवाळा ऋतू बहुतांश लोकांना आवडत असला तरीही या दिवसांत शारीरिक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. यापैकीच एक समस्या म्हणजे सांधेदुखी. थंडीच्या दिवसांत काही लोक गुडघे, खांदे किंवा कमरेच्या दुखण्यामुळे त्रासलेले असतात. पूर्वी वृद्धांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळत असे पण आता तरुण मंडळींमध्येही सांधेदुखीची समस्या वाढतेय. तुम्ही देखील या समस्येचा सामना करताय का? तर काही साधेसोपे उपाय जाणून घेऊया...

थंडीमध्ये सांधेदुखीची समस्या का वाढते?

प्रसिद्धी एमबीबीएस एमडी डॉक्टर शालिनी सिंह सोलंकी यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांध्यांबाबत माहिती शेअर केलीय. डॉ. शालिनी यांनी सांगितलं की, शरीराच्या सांध्यांमध्ये एक विशेष प्रकारचा द्रवपदार्थ (Synovial Fluid) असतो, जो सांध्यांसाठी वंगणाप्रमाणे काम करतो आणि सांध्यांचे घर्षण कमी होते. पण थंडीच्या दिवसात हा द्रवपदार्थ घट्ट होतो, ज्यामुळे सांध्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. 

थंडीमध्ये सांधेदुखीच्या समस्येतून सुटका कशी मिळवावी?

सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांनी पाच सोपे उपाय सांगितले आहेत. 

पहिला उपाय - गरम तेलाने मसाज करावा

तीळ किंवा मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे आले आणि ओवा मिक्स करून तेल हलकेसे गरम करा. या तेलाने दिवसातून दोनदा सांध्यांचा मसाज करावा. मसाज केल्याने सांध्यांच्या भागातील रक्त प्रवाह सुधारेल आणि वेदनेपासून मुक्तता मिळेल, असे डॉक्टरांचे म्हणणंय. 

दुसरा उपाय - अँटी-इन्फ्लेमेटरी खाद्यपदार्थ 

डॉक्टर शालिनी यांनी सांगितले की, डाएटमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरीयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा, उदाहरणार्थ आले, हळद, लसूण, काळी मिरी, अक्रोड, मेथी, चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स. अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेल्या खाद्यपदार्थांमुळे सांध्यांवरील सूज कमी होण्यास मदत मिळेल. 

Advertisement

तिसरा उपाय - योग आणि स्ट्रेचिंग व्यायाम  

सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 15 योग आणि सोपे व्यायाम करा. तसेच दर 1-2 तासांमध्ये पाच ते दहा मिनिटे स्ट्रेचिंग व्यायाम करावा. यामुळे स्नायू लवचिक होतील आणि वेदना कमी होतील. 

Advertisement

(नक्की वाचा: Flaxseeds Benefits: अळशीच्या बियांचे सेवन सकाळी की रात्री करावे? वेटलॉस होईल का? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

चौथा उपाय - गरम पाण्याने शेक द्यावा

सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा गरम पाण्याने शेक द्यावा. यामुळे वेदनेपासून आराम मिळेल.  

पाचवा उपाय - खूप पाणी प्यावे

हिवाळ्यामध्ये लोक पाणी कमी प्रमाणात पितात, यामुळेही सांध्यांचे दुखणे वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. 

(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण 2 मिनिटांत पटकन बाहेर पडेल, करा हे 8 उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )