Winter Health Tips: तुम्हाला देखील सकाळची दमदार सुरुवात करायचीय का, ज्यामुळे केवळ झोपच उडणार नाही तर दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहील? तर सकाळी रिकाम्या पोटी कॉफी-चहा पिण्याऐवजी बीट, गाजर आणि आवळ्याचा ग्लासभर ज्युस प्यावा. या ज्युसद्वारे शरीराला व्हिटॅमिन, अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजांचा पुरवठा होईल. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल, त्वचेचे आरोग्य, पचनप्रक्रिया, हृदयाच्या आरोग्यासह संपूर्ण आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.
रिकाम्या पोटी आवळा, बीट आणि गाजराचा रस पिण्याचे फायदे | Amla Beet Carrot Juice
1. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल
आवळा, बीट आणि गाजरातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. आवळ्यातील व्हिटॅमिन सीमुळे शरीराची चयापचयाची गती जलद होईल आणि शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. बीटमध्ये लोह, फॉलेट, नायट्रेट्स असते. ज्यामुळे रक्तप्रवाह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढेल. गाजरमधील बीटा कॅरोटिनमुळे (व्हिटॅमिन ए) दृष्टी, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.
2. निरोगी त्वचा
आवळा आणि गाजरमुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढण्यासाठी मदत मिळेत, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. बीटमधील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारेल, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येईल. आवळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फ्लेवेनोइड्समुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळेल.
3. पचन प्रक्रिया सुधारुन शरीर डिटॉक्स होईल
आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे पोटातील अॅसिडची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळेल आणि पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका होईल. बीटमधील पोषणतत्त्वांमुळे शरीर डिटॉक्स होईल आणि रक्त देखील शुद्ध होते. गाजरमधील फायबरमुळे आतड्यांची हालचाल होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Walnut Benefits: अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास काय होईल? शरीराला मिळतील 5 फायदे)
4. रक्तप्रवाह सुधारेल
बीट, गाजरातील लोह आणि फॉलेटमुळे लाल रक्तपेशी तयार होण्यास तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळेल. आवळ्यातील लोहामुळे पोषणतत्त्व शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारेल, अॅनिमियाची समस्या दूर होते. थकवा दूर करण्यासाठी बीट-आवळा-गाजर ज्युस पिणे रामबाण उपाय ठरू शकतो.
आवळा, बीट, गाजरमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, पण पोषणतत्त्वांची कमतरता नसते. आवळ्यातील गुणधर्मांमुळे चयापचयाची गती जलद होऊन फॅट्स बर्न होण्यास मदत मिळेल. नियमित हा उपाय केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Jaggery Benefits: शुद्ध गूळ कसा ओळखावा? MasterChefने सांगितलं हिवाळ्यात गूळ खरेदी करताना 3 गोष्टींची काळजी घ्या)
6. हृदयाचे आरोग्यबीटमुळे रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत मिळेल, हृदयाचे आरोग्य निरोगी राहील.
घरच्या घरी आवळा, बीट आणि गाजरचा ज्युस कसा तयार करावा?सामग्री:
- एक आवळा
- एक मध्यम आकाराचे बीट
- एक मध्यम आकाराचे गाजर
- दीड इंची आले
- अर्धा लिंबू
- एक-दोन चमचे मध किंवा गूळ (पर्यायी)
- एक-दीड कप पाणी
बीट, गाजरची साल काढा. आवळा, बीट, गाजर चिरून घ्या.
आवळा, बीट, गाजर, आले आणि पाणी एकत्रितरित्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या.
शक्यतो रस गाळून पिऊ नका, पण जाडसर ज्युस पिणे तुम्हाला शक्य होत नसल्यास गाळावा.
हवे असल्यास ज्युसमध्ये लिंबाचा रस, गूळ मिक्स करू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)