जाहिरात

Women Property : पती-मुलं नसतील तर महिलेच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार? माहेर की सासर; हैराण करणारा नियम

जर एका विवाहित हिंदू महिलेचं मृत्यूपत्र न करता निधन झालं आणि तिच्यामागे तिचा पती किंवा मुलगा जिवंच नसेल तर तिच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार असेल?

Women Property : पती-मुलं नसतील तर महिलेच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार? माहेर की सासर; हैराण करणारा नियम
AI Image

Women Property Inheritance Rules : जर एका विवाहित हिंदू महिलेचं मृत्यूपत्र न करता निधन झालं आणि तिच्यामागे तिचा पती किंवा मुलगा जिवंच नसेल तर तिच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार असेल? अधिकांश लोकांना वाटत असेल की महिलेची संपत्ती महिलेचे आई-बाबांना मिळेल. मात्र भारतीय कायद्याचा नियम तुम्हाला हैराण करेल.

हिंदू उत्ताराधिकार अधिनियमाअंतर्गत महिलेची संपत्ती तिच्या आई-वडिलांना मिळेल की नाही हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. महत्त्वाचं म्हणजे ती संपत्ती महिलेकडे कशी आली याचा शोध घेतला जातो. त्यावर ती संपत्ती कुणाला दिली जाईल हे ठरवलं जातं.

स्वत:च्या कमाईने संपत्तीची खरेदी...

महिलेने संपत्ती स्वत:च्या पैशांनी खरेदी केलेली असावी किंवा तिला कुणाकडून मिळालेली असेल तरीही पहिला हक्क पती आणि मुलांचा असतो. जर दोघेही नसतील तर कायदेशीर ही संपत्ती महिलेच्या आई-वडिलांना नाही तर तिच्या पतीचे नातेवाईक (सासू-सासरे, दीर) यांना मिळेल. महिलेच्या आई-वडिलांना नंबर यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो.

नक्की वाचा - 'ती ड्युअल पर्सनालिटी...'; चौथी व्यक्ती डोक्यात; ट्विशा प्रकरणात निवृत्त जज सासू गिरीबाला सिंह यांचा मोठा आरोप

आई-वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचं काय?

जर महिलेला ही संपत्ती आपल्या आई-वडिलांकडून वारशातून मिळाली असेल तर नियम वेगळे आहेत. या प्रकरणात पती किंवा मुलं नसल्यास ती संपत्ती पुन्हा महिलेच्या वडिलांच्या वारशांकडे जाते. यावर पतीच्या कुटुंबाचा कोणताही हक्क राहत नाही.

पती किंवा सासऱ्याकडून मिळालेल्या संपत्तीचं काय?

जर महिलेला कोणतीही संपत्ती तिचा पती किंवा सासऱ्याकडून मिळाली तर पती आणि मुलं नसताना ही संपत्ती पतीच्या कायदेशीर वारशांकडे जाईल.

पुरुष आणि महिलांमधील कायदेशीर फरक...

सध्याच्या कायद्यात एक मोठा फरक पाहायला मिळतो. जर हिंदू पुरुषाचं निधन मृत्यूपत्र न करता झालं असेल तर त्याची आई वारसा हक्काच्या रांगेत प्रथम असते. मात्र, स्त्रीच्या बाबतीत, तिचे आई-वडील वारसा हक्काच्या रांगेत शेवटचे असतात. या नियमावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली असून, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

महिलांनी मृत्यूपत्र बनवणं आवश्यक का आहे?

कायदेशीर तज्ज्ञांनुसार, महिलांसाठी मृत्यूपत्र बनवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ज्या महिला एकट्या आहेत, विधवा किंवा घटस्फोटित आहे. ज्या महिलेवर तिचे आई-वडील आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, अशा सर्व महिलांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवायला हवं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com