Yogini Ekadashi 2025: हिंदू धर्मात योगिनी एकादशीला (Significance of Yogini Ekadashi) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगिनी एकादशीचा उपवास केल्याने सुख-समृद्धी लाभते, असा समज आहे. यंदा 21 जून रोजी योगिनी एकादशी येत असून, शनिवारीच म्हणजे 21 जून रोजीच उत्तरी गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असणार आहे. हा दुर्मीळ योग तब्बल 19 वर्षांनी जुळून येत असल्याने यंदाच्या योगिनी एकादशीचे अधिक महत्त्व याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
नक्की वाचा : घरामध्ये आरसा चुकीच्या ठिकाणी लावलाय? प्रगतीमध्ये येतील अडथळे, ज्योतिषांकडून जाणून घ्या उपाय
योगिनी एकादशीचे महत्त्व काय आहे ? (What is the significance of Yogini Ekadashi?)
योगिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळण्यास मदत होते अशी धार्मिक धारणा आहे. (Benefits of Yogini Ekadashi vrat) ज्या मंडळींना दीर्घकाळापासून शारिरीक व्याधी आहेत त्यांनी या दिवशी केलेला उपवास हा फायदेशीर ठरतो असे मानले जाते. वाईट गोष्टींचा क्षय व्हावा यासाठी ही एकादशी महत्त्वाची मानली जाते. एक समज असाही आहे की योगिनी एकादशीला अपवास केल्याने पूर्वजन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. पुराणांमध्ये योगिनी एकादशीला रोगांपासून मुक्ती देणारी एकादशी म्हणून म्हटले जाते.
(नक्की वाचा : कुठे आहे पालखी? एकाच क्लिकवर करा Track; वाहतुकीचे बदल, पुढचा टप्पा याचीही माहिती मिळणार!)
योगिनी एकादशीची पूजा कशी करावी ? (How to do pooja on Yogini Ekadashi)
योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवासही केला जातो. या दिवशी अन्नदान केल्याने मोठे पुण्य लाभते असे मानले जाते. (Why is it important to fast on Yogini Ekadashi?) या अन्नदानामुळे प्रपंचातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती मिळते असे सांगितले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी केलेला उपवास इंद्रियांवरील संयम आणि आत्म-चिंतनासाठी प्रेरणा देते. योगिनी एकादशीला भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा करत असताना विष्णू-लक्ष्मीला फळे, पिवळी फुले आणि तुळस अवश्य अर्पण करावी. अर्पण करण्यासाठीची तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत, असे मानले जाते.
(नक्की वाचा : पालखी मार्गावरील सुरक्षेसाठी यंदा एआयची नजर)
19 वर्षानंतर जुळून आला दुर्मीळ योग (Why is Yogini Ekadashi special this year?)
यंदा 21 जून रोजी योगिनी एकादशी आणि वर्षातील सर्वात मोठा दिवस एकाच दिवशी आहेत. हा योग तब्बल 19 वर्षांनंतर जुळून येत असल्याने यंदाची योगिनी एकादशी ही यामुळेच महत्त्वाची असल्याचे मानले जाते. 21 जूनचा दिवस मोठा असणार आहे म्हणजेच शनिवारी सूर्य लवकर उगवेल आणि उशिरा मावळेल, योगिनी एकादशीला 'दिवस' 14 तासांचा असणार आहे.
तिथी आणि राहुकाळ
पंचांगानुसार, योगिनी एकादशीसाठीची तिथी 21 जून रोजी सकाळी 07 वाजून 18 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 जून रोजी पहाटे 04 वाजून 27 मिनिटांनी समाप्त होईल. (What time does Yogini Ekadashi start and end?) राहुकाळ सकाळी 08:53 ते 10:38 पर्यंत राहील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)