जाहिरात

Pune Palkhi 2025 Live Tracking : कुठे आहे पालखी? एकाच क्लिकवर करा Track; वाहतुकीचे बदल, पुढचा टप्पा याचीही माहिती मिळणार!

देहूतून तुकाराम महाराजांची पालखी रवाना झाली असून आज आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही तासात पंढरपुरच्या दिशेने रवाना होईल. दोन्ही पालखांचं ट्रॅकिंग करणं शक्य होणार आहे.

Pune Palkhi 2025 Live Tracking  : कुठे आहे पालखी? एकाच क्लिकवर करा Track; वाहतुकीचे बदल, पुढचा टप्पा याचीही माहिती मिळणार!

Pune Palkhi Route Live Tracking : देहूतून तुकाराम महाराजांची पालखी रवाना झाली असून आज आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही तासात पंढरपुरच्या दिशेने रवाना होईल. आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहे. पुण्यात तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्या दरम्यान पुण्यातील वाहतुकीत (Pune Traffic) मोठा बदल करण्यात आला आहे. या सर्वाची माहिती तुम्हाला एकाच क्लिकवर पाहता येणार आहे. 

पालखी सोहळा कसा कराल ट्रॅक (Pune Palkhi Live Tracking )

दरवर्षी लाखो वारकरी पालखी सोहळ्यासाठी पुण्यनगरीत वास्तव्यास येत असतात तर अनेक VIP देखील या दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी येतात. दोन्ही पालख्यांच्या मिळून एकूण ७१९ दिंड्या पुण्यात दोन दिवस मुक्कामी असतील. दरम्यान २० जूनपासून या पालखी सोहळ्याचं लाइव्ह ट्रॅकिंग करता येणार आहे. म्हणजे तुम्हालाही पालखीत सामील व्हायचं असेल तर या मॅपवरुन तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. याशिवाय पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत काही बदल केले असतील तर त्याही माहिती मिळेल. येथे तुम्हाला पार्किगच्या सुविधा कुठे कुठे उपलब्ध आहेत, याचीही अपडेट मिळू शकेल. 

पुणे पालखी ट्रॅक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

Latest and Breaking News on NDTV

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 (Pune Palkhi 2025 )

    • 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
    • 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी 
    • 21/06/2025 पुणे मुक्काम 
    • 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
    • 23/06/2025 सासवड मुक्काम 
    • 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
    • 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
    • 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी 
    Latest and Breaking News on NDTV
      • माऊलींना निरास्मान 
      • 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी 
      • 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी 
      • 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी 
      • 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी 
      • बरड येथे गोल रिंगण
      • 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी 
      • सदाशिवनगर येथे गोल रिंगण
      • 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी 
      • खुडूस येथे गोळ रिंगण
      • 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी 
      • ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
      • 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
      • बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 
      • 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
      • वाखरी येथे गोल रिंगण 
      • 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
      • 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com