Zomato Platform Fee Hike: चाराण्याची कोंबडी आणि....टॅक्समुळे पदार्थांची किंमत दुप्पट; झोमॅटोची भरमसाठ दरवाढ

Zomato Hikes Platform Fee: २०१७ मध्ये सुरुवातीला २ रुपये असलेले शुल्क आज १२ रुपयांपर्यंत पोहोचवले आहे, म्हणजेच कंपनीने आतापर्यंत शुल्कात सहा पटीने वाढ केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Zomato Platform Fee Hikes: ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध फूड डिलिव्हरी ॲप 'झोमॅटो'ने आपली ‘प्लॅटफॉर्म फी' १० रुपयांवरून १२ रुपये केली आहे. त्यामुळे आता 'झोमॅटो'वरून फूड ऑर्डर करणे आणखी महाग झाले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढणार असल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असून, यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात अतिरिक्त महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र या निर्णयाने ग्राहकांना मात्र चांगलाच झटका बसला आहे.

 Blood Pressure High झाल्यास गरम की थंड पाण्याने आंघोळ करावी? डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय)

गेल्या वर्षीही 'झोमॅटो'ने सणांच्या काळातच प्लॅटफॉर्म शुल्क ६ रुपयांवरून १० रुपये केले होते. आता पुन्हा एकदा त्यात वाढ करून कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ही शुल्कवाढ सर्वच शहरांमध्ये लागू असून, ‘झोमॅटो गोल्ड' मेंबर्सनाही आता प्रति ऑर्डर १२ रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागणार आहे. 'झोमॅटो'ने २०१७ मध्ये सुरुवातीला २ रुपये असलेले शुल्क आज १२ रुपयांपर्यंत पोहोचवले आहे, म्हणजेच कंपनीने आतापर्यंत शुल्कात सहा पटीने वाढ केली आहे.

WhatsApp जबरदस्त फीचर, आता AI मेसेज टाईप करण्यासाठी करणार मदत

या निर्णयामुळे 'झोमॅटो'च्या ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सच्या मते, डिलिव्हरी शुल्क, प्लॅटफॉर्म फी आणि इतर शुल्क मिळून आता ऑर्डरची एकूण किंमत मूळ खाद्यपदार्थांच्या किमतीपेक्षा जास्त होत आहे, ज्यामुळे ऑनलाइन ऑर्डरिंगचा खर्च खूप वाढला आहे. 'झोमॅटो'ची प्रतिस्पर्धी कंपनी 'स्विगी'नेही नुकतीच काही निवडक शहरांमध्ये आपली प्लॅटफॉर्म फी १४ रुपये केली आहे. यामुळे दोन्ही मोठ्या कंपन्या नफा मिळवण्यासाठी ग्राहकांच्या खिशावर भार टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Topics mentioned in this article