
High Blood Pressure: उच्च रक्तदाब ही समस्या आताच्या धावपळीच्या युगामध्ये सामान्य ठरतेय. लहान वयामध्येही लोक वाढत्या बीपीच्या समस्येने त्रस्त आहात. यामागील प्रमुख कारण म्हणजे अयोग्य जीवनशैली, ताणतणाव, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन करणे आणि कमी व्यायाम करणे असू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणंय. जेव्हा रक्तदाबाची पातळी वाढते तेव्हा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असते. बीपी वाढल्यास थंड पाण्याने आंघोळ की गरम पाण्याने? असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये डोकावते. जाणून घेऊया तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती...
न्युट्रिशनिस्टने काय सांगितले?
प्रसिद्ध सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी त्यांच्या यु-ट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय की, जर तुमचा रक्तदाब वारंवार वाढत असेल तर कायम थंड पाण्याने आंघोळ करावी.
थंड पाणी फायदेशीर कसे ठरू शकते?
रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते
डॉक्टर रयान यांनी सांगितले की, थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील नसा आकुंचन पावतात आणि पुन्हा विस्तारतात. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि हृदयावरील दाब कमी होतो.
(नक्की वाचा: High Blood Pressure: हाय बीपीची समस्या असणाऱ्यांनी काय खाऊ नये?)
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
रीसर्चमधील माहितीनुसार, नियमित थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते
थंड पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचे झालेले नुकसान भरुन निघण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: High Blood Pressure Remedy: दोन चमत्कारी ड्रिंक्स! प्याल तर मजा येईल; BP आणि हायपर टेन्शन गायब होईल)
मानसिक शांतता
याव्यतिरिक्त थंड पाण्याने आंघोळ केल्यास मेंदू शांत राहण्यास मदत मिळते, तणाव कमी होतो आणि मूड देखील चांगला होतो. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
गरम पाण्याने आंघोळ का करू नये?
- गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला आराम मिळतोच, पण हाय बीपी असणाऱ्या लोकांनी गरम पाण्याने आंघोळ करणं टाळावे.
- गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि रक्तदाब अचानक वाढू शकतो.
- अशा परिस्थितीत एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world