
- WhatsApp अपने यूजर्स के लिए राइटिंग हेल्प फीचर लेकर आया है।
- राइटिंग हेल्प फीचर यूजर्स को AI के जरिए मैसेज लिखने में मदद करता है।
- WhatsApp का कहना है कि राइटिंग हेल्प फीचर बिलकुल प्राइवेट है।
व्हॉट्सॲपने आपल्या यूजर्ससाठी एक नवे 'रायटिंग हेल्प' (Writing Help) फीचर आणले आहे. हे फीचर यूजर्सना त्यांचे मेसेज अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवण्यासाठी मदत करेल. या नवीन फिचरमुळे मेसेजला प्रोफेशनल, मजेदार किंवा अधिक उपयुक्त बनवण्यासाठी विविध पर्याय मिळतील.
व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सना नेहमीच नवीन फीचर्स देऊन अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करते. याच प्रयत्नात आता ते 'रायटिंग हेल्प' हे एक नवीन फीचर आणत आहेत. हे टूल यूजर्सना त्यांचे मेसेज वेगळ्या पद्धतीने मांडण्यास मदत करते. हे मेसेज तुम्ही प्रोफेशनल, मजेशीर किंवा अधिक उपयुक्त बनवू शकता. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये तुम्हाला सूचनांसह पेन्सिलचा एक आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करून तुम्ही सूचना निवडू शकता.
(नक्की वाचा- फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळं, आरोग्यावर होतो वाईट परिणाम)
'रायटिंग हेल्प' फीचर कसं काम करतं?
व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की हे फीचर पूर्णपणे खासगी आहे. 'रायटिंग हेल्प' हे 'प्रायव्हेट प्रोसेसिंग' तंत्रज्ञानावर काम करते. या तंत्रज्ञानामुळे 'मेटा एआय'ला तुमचे मेसेज न पाहताही सूचना देता येतात. या फिचरच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी व्हॉट्सॲपने बाहेरच्या सुरक्षा तज्ज्ञांसोबत काम केले आहे. तसेच, 'एनसीसी ग्रुप' आणि 'ट्रेल ऑफ बिट्स' या स्वतंत्र संस्थांच्या ऑडिटनेही या प्रणालीच्या डिझाइनला मान्यता दिली आहे.
वापरण्याबाबतचा निर्णय यूजर्सचा असेल
'मेटा'ने एक इंजिनिअरिंग ब्लॉग आणि एक तांत्रिक व्हाईट पेपर प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये 'प्रायव्हेट प्रोसेसिंग' कसे काम करते आणि 'रायटिंग हेल्प' सारख्या फिचर्सना कसे समर्थन देते, हे स्पष्ट केले आहे. हे फिचर डिफॉल्टनुसार बंद असेल, त्यामुळे याचा वापर करायचा की नाही हे पूर्णपणे यूजर्सवर अवलंबून असेल. सुरुवातीला हे फीचर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये इंग्रजी भाषेत सुरू केले जात आहे. या वर्षाच्या अखेरीस यामध्ये इतर भाषा आणि क्षेत्रांचाही समावेश करण्याची योजना आहे.
(नक्की वाचा: Blood Pressure High झाल्यास गरम की थंड पाण्याने आंघोळ करावी? डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय)
'व्हॉट्सॲप'ने नुकतेच 'ग्रुप कॉल'साठी नवीन फिचर्स सुरू केले आहेत. यामध्ये कॉल शेड्युल करणे, सहभागींना मॅनेज करणे, कॅलेंडर लिंक तयार करणे आणि कॉल सुरू होण्याआधी नोटिफिकेशन मिळणे या सुविधांचा समावेश आहे. यूजर्स आता कॉलदरम्यान हात वर करू शकतात किंवा रिएक्शन पाठवू शकतात. तसेच, कॉल लिंक तयार करणाऱ्यांना कोणीही कॉलमध्ये सामील झाल्यास अलर्ट मिळतो. विशेष म्हणजे, 'व्हॉट्सॲप'वरील सर्व कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात, ज्यामुळे त्यांची गोपनीयता कायम राहते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world