जाहिरात

Ideal Wedding: आजोबा 11 वेळा आमदार, भाऊही आमदार, पण... आदर्श विवाहसोहळ्याची राज्यात चर्चा!

Dr. Aniket Deshmukh Astha Deshmukh Ideal Wedding Ceremony: आजोबा 11 वेळा आमदार, सख्खा भाऊ विद्यमान आमदार, अशी राजकीय परंपरा लाभलेल्या एका तरुणाने केलेले साधेपणातील लग्रसोहळ्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

Ideal Wedding: आजोबा 11 वेळा आमदार, भाऊही आमदार, पण... आदर्श विवाहसोहळ्याची राज्यात चर्चा!

Aniket Deshmukh Astha Deshmukh Ideal Wedding: अलिकडच्या काळात लग्नसोहळा म्हणजे श्रीमंती, बडेजाव अन् थाटमाट, झगमगाट दाखवण्याचा सणच जणू. त्यात लग्न एखाद्या पुढाऱ्याच्या मुलाचे, नातेवाईकाचे असले तर त्याचा थाट काही औरच असतो. राजकीय नेते मंडळींच्या घरातील लग्नसोहळ्यात होणारा कोट्यवधी रुपयांचा चुराडा हा नेहमीच चर्चेचा विषय.. पण सध्या सोशल मीडियावर एका आदर्श लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आजोबा 11 वेळा आमदार, सख्खा भाऊ विद्यमान आमदार, अशी राजकीय परंपरा लाभलेल्या एका तरुणाने केलेले साधेपणातील लग्रसोहळ्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावर सध्या एका विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा होत आहे. हा विवाह सोहळा आहे सांगोल्याचे माजी आमदार, दिवंगत नेते गणपत आबा देशमुख यांच्या नातवाचा. गणपत आबा देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव. सांगोला विधानसभा मतदारसंघातून सलग 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे.

शेतकरी कामगार पक्षाचा लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत 2024 मध्ये बाबासाहेब देशमुख यांनीही आमदारकी मिळवली. याच बाबासाहेब देशमुख यांचे सख्खे बंधु अनिकेत देशमुख यांचा लग्नसोहळा सध्या चर्चेत आहे. डॉक्टर असलेले अनिकेत देशमुख यांनी कोणताही थाटमाट बडेजाव न करता रसिस्टर पद्धतीने लग्नगाठ बांधली.

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi : 'माझी बहीण गुन्हेगार' राजाच्या आईचे पाय धरत सोनमच्या भावाचा मोठा निर्धार )

लग्नात होणाऱ्या सगळ्या खर्चांना, झगमगाट अन् शाही मिरवणुकांना फाटा देऊन डॉ. अनिकेत देशमुख यांनी अत्यंत साधेपणाने धाराशिव तालुक्यातील पळशीप गावच्या कन्या डॉ. आस्था पाटील यांच्याशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत  लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या साध्या लग्नसोहळ्यावर सोशल मीडिया जगत फिदा झाले आहे. एवढा मोठा राजकीय वारसा असलेली व्यक्ती अशा साध्यापद्धतीने लग्न करु शकते तर आपण का नाही? असाच सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

दरम्यान, अनिकेत देशमुख यांनी डॉक्टरची पदवी संपादन केली असून वैद्यकीय क्षेत्रात ते कार्यरत असतात. त्याचबरोबर आस्था पाटील- देशमुख यांनीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली असून त्या सध्या सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये ऑफिसर म्हणून काम करत आहेत. दोघेही सुशिक्षित असून त्यांनी आपल्या या विवाहसोहळ्याने नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com