जाहिरात

Shirish More Letter : 'आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त...', शिरीष महाराजांचं होणाऱ्या बायकोसाठी शेवटचं पत्र, वाचताना डोळे पाणावतील!

तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज यांनी स्वत:चा जीव का घेतला याचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे.

Shirish More Letter : 'आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त...', शिरीष महाराजांचं होणाऱ्या बायकोसाठी शेवटचं पत्र, वाचताना डोळे पाणावतील!

Shirish Maharaj Last Letter : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हभप शिरीष महाराज मोरे (वय 32) यांनी राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. 14 दिवसांवर त्यांचं लग्न होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. नवी नवरी संसाराची स्वप्न रंगवत होती. मात्र अचानक शिरीष मोरे यांनी आपल्या आयुष्याचा असा शेवट केला. यामुळे मोरे कुटुंबासह देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्राथमिक तपासानुसार शिरीष मोरे यांना आर्थिक चणचण होती. त्यांच्यावर बरंच कर्ज होतं. काही वृत्तानुसार त्यांच्यावर 32 लाखांचं कर्ज होतं. यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी शिरीष मोरे यांनी अनेक पत्र लिहून ठेवली होती. यात त्यांनी कोणाकडून किती कर्ज घेतलं याचाही उल्लेख आहे. शिरीष यांनी होणारी पत्नी, मित्र, आई-वडील यांच्यासाठी (Shirish Maharaj 32 Lakh Loan) चार पत्र लिहून ठेवली होती. ती पत्र समोर आली आहेत.   

पहिलं पत्र होणाऱ्या पत्नीसाठी, माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातो... खरंतर तुझा आता कुठे हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती न मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागलो मला माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा. तुला न्याय नाही देऊ शकतो. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला, तर माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहण्याऱ्या माझ्या सखे माझ्या चांगले वेळेची हकदार होतीस तू. माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय, असं शिरीष महाराज मोरे म्हणाले.

Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन  

नक्की वाचा - Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन  

कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारतदर्शन राहिलं. सगळंच तर राहीलं. मी काहीही न देता सुद्धा तू मात्र माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस. खूप गोड आहेस तू. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल, पण जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल. थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो आणि हो, खूप झाले कष्ट. आता work from home नको. खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर तुझाच अहो शिरीष मोरे. आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका, तिला कधी वेळच देता आला नाही. परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही, अशी विनंतीही पत्रात शिरीष मोरे यांनी मित्रांना केली आहे.

दुसरं पत्र कुटुंबाला... प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय... खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच. पण कृपा करुन आई-वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय. त्याची सारी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करुन आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा, असं मोरेंनी पत्रात म्हटलंय.

Alandi : आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू; लैंगिक शोषणाच्या वृत्तानंतर NDTV मराठीच्या ग्राऊंड रिपोर्टमधून मोठा खुलासा

नक्की वाचा - Alandi : आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू; लैंगिक शोषणाच्या वृत्तानंतर NDTV मराठीच्या ग्राऊंड रिपोर्टमधून मोठा खुलासा

‘यु्द्ध हरलो, मला माफ करा,' असे म्हणत आई-वडील, मित्र आणि होणारी पत्नी यांच्या नावाने शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या (सुसाइड नोट) समोर आल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष कुमार यांनी अलीकडेच नवं घर बांधलं होतं. खाली त्यांचे आई-वडील राहत होते. ते वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत गेले ते परत आलेच नाही. बुधवारी सकाळी उशीरापर्यंत ते खोलीतून बाहेर न आल्याने आई-वडिलांनी दार ठोठावलं. पण कुणीच बाहेर आलं नाही. शेवटी दार तोडल्यानंतर ते पंख्याच्या हुकाला लटकलेले दिसले. उपरण्याने त्यांनी गळफास घेतला होता.