Dhule News : धुळे शहरात खळबळ! डॉगेश भाईंच्या गँगचा अचानक झाला मृत्यू, 12 श्वानांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

12 Dogs Died In Dhule Ciry : धुळे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील देवपूर परिसरात असलेल्या 12 श्वानांचा अचानक मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
12 Dogs Died In Dhule City
मुंबई:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

12 Dogs Died In Dhule Ciry : धुळे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील देवपूर परिसरात असलेल्या 12 श्वानांचा अचानक मृत्यू झाला. इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच दिवशी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण श्वानांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची सखोली चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धुळ्यातील प्राणी प्रेमींनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून धुळे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.या श्वानांमुळे नाहक त्रास सहन करावा लागल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे. अशातच 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. श्वानांचा मृत्यू कशामुळे झाला, यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. श्वानांच्या मृत्युमागे नैसर्गिक कारण असावं, अशी शक्यता महानगरपालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण याप्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाल्यास याची चौकशी केली जाईल, असं महानगरपालिकेचे अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> मुंबईत खळबळ!पोलिसांनी 29 कोटींचा ड्रग्ज साठा केला नष्ट, कफ सिरपच्या 1269 बाटल्यांचाही समावेश, घडलं तरी काय?

पुणे शहरात घडली होती धक्कादायक घटना 

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचं समोर आलं होतं. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.  शहराच्या विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच  वढगाव शेरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. घराच्या अंगणात खेळत असताना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक चिमुकली गंभीर जखमी झाली होती. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. भटक्या कुत्र्यांनी या मुलीला चावा घेत तिला फरफटत नेलं होतं. त्यामुळे तिला गंभीर जखमा झाल्या होत्या.

नक्की वाचा >> सामन्यापूर्वीच पाकिस्तानी महिला कॅप्टनने उडवली खळबळ! म्हणाली, आधी जे काही झालंय, ते आम्हाला..