जाहिरात

मुंबईत खळबळ!पोलिसांनी 29 कोटींचा ड्रग्ज साठा केला नष्ट, कफ सिरपच्या 1269 बाटल्यांचाही समावेश, घडलं तरी काय?

Mumbai Drug Racket Crime News :  मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी 29  कोटी 76  लाखांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे.

मुंबईत खळबळ!पोलिसांनी 29 कोटींचा ड्रग्ज साठा केला नष्ट, कफ सिरपच्या 1269 बाटल्यांचाही समावेश, घडलं तरी काय?
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Mumbai Drug Racket Crime News :  मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी 29  कोटी 76  लाखांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. विविध 27 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 240 किलो 420 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून नष्ट केलेल्या ड्रग्जमध्ये गांजा,चरस,मेफेड्रोन,हेरॉईन,कोकेन,कफ सिरप बाटल्यांचा समावेश होता.तसच नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोरेक्स कफ सिरपच्या 1269 बॉटल्स,अल्प्रेझोलम नावाच्या 12730 टॅब्लेट्सचा आणि 5752 ट्रॅमाडोल (Tramadol) टॅब्लेट्सचाही यात समावेश होता. मीरा-भाईंदर,वसई-विरार पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कक्ष एकने ही धडक कारवाई केलीय.

240 किलो 420 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर,वसई-विरार पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत 29 कोटी 76 लाख 46 हजार 540 रुपये इतक्या किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले.यामध्ये गांजा,चरस,मेफेड्रोन,हेरॉईन,कोकेन,कफ सिरप बाटल्या त्याचप्रमाणे अल्प्राझोलम आणि ट्रमाडोल टॅबलेट्सचाही समावेश होता. एकूण 240 किलो 420 ग्रॅम वजनी जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा साठा नुकताच तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीत नष्ट करण्यात आला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या कक्ष -1 च्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> सामन्यापूर्वीच पाकिस्तानी महिला कॅप्टनने उडवली खळबळ! म्हणाली, आधी जे काही झालंय, ते आम्हाला..

16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात विविध 27 गुन्ह्यांतर्गत हा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.यात काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल 1269 कोरेक्स या कफ सिरपच्या बॉटल्सचा आणि  अल्प्रेझोलम नावाच्या 12730 टॅब्लेट्सचा समावेश होता.तर,नयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या 5752 ट्रॅमाडोल टॅबलेट्सचा साठाही पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. 

नक्की वाचा >> बाईईई..हा काय प्रकार! दसऱ्याला सोनं खरेदीत 25 टक्क्यांनी झाली घट, मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं

मध्यप्रधेशमध्ये कप सिरपमुळे झाला होता 11 लहान मुलांचा मृत्यू 

मध्यप्रदेशच्या धिंदवाडा येथे विषारी कप सिरपमुळे 11 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती.  याप्रकरणी धिंदवाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण सोनीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सोनीवर विषारी सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी  डॉक्टर सोनीला शनिवारी उशिरा रात्री अटक केली. कप सिरप प्यायल्याने 11 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली होती. विषारी कप सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे बीएमओ अंकित यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डॉ.सोनी आणि श्रीसन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com