बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; विद्यार्थ्यांची धडधड वाढणार!

बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 मे मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने नुकतीच याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण यांना विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आली होती. याबाबत आज निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळावरून आपला निकाल पाहता येणार आहे.

पुढील संकेतस्थळावर आपला केंद्र क्रमांक, आसन क्रमांक व आईचे नाव टाकल्यावरती हा निकाल पाहता येणार आहे .

mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

http://results.targetpublications.org