Mumbra News: मुंब्र्यात मोठी दुर्घटना! इमारतीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा अंत; 5 जण बचावले

१३ वर्षीय आस्मा कादर शेख हिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, ठाणे:

 Mumbra Building Collapse: मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात आज संध्याकाळी एका जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा जण स्लॅबखाली अडकले होते. बचाव पथकाने तातडीने सर्वांना बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान १३ वर्षीय मुलगी आस्मा कादर शेख हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Sindhudurg News: गोवा-पणजी येथून बस कोकणच्या दिशेनं निघाली, 200 फूट खोल दरीजवळ अपघात घडला, 45 प्रवासी अन्..

इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, चिमुकलीचा दुर्दैवी अंत!

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटांनी जनता बेकरीजवळील दर्गा गल्ली, अमृतनगर, मुंब्रा येथे घडली. फैय्याज अपार्टमेंट या तळमजला अधिक चार मजली आणि सुमारे ३८ वर्षे जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब थेट पहिल्या मजल्यावर कोसळला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टीडीआरएफ, पोलीस आणि टोरंट पॉवरसह विविध यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या कारवाईत सहा रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यापैकी पाच जण सुखरूप असून, गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय आस्मा कादर शेख हिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव फैय्याज अपार्टमेंट ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीतील सुमारे ७० ते ८० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७८ आणि १२३ मध्ये सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाकडून पुढील तपास आणि सुरक्षेच्या उपाययोजना सुरू आहेत.

नक्की वाचा >> Sangli News: पत्नीला जिवंत जाळून हत्या करणाऱ्या पतीला सर्वात भयंकर शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय