जाहिरात

Sangli News: पत्नीला जिवंत जाळून हत्या करणाऱ्या पतीला सर्वात भयंकर शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सांगली जिल्ह्यातील विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पतीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Sangli News: पत्नीला जिवंत जाळून हत्या करणाऱ्या पतीला सर्वात भयंकर शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Sangli Crime Latest News Update

शरद सातपुते, प्रतिनिधी 

Sangli Crime News Update : सांगली जिल्ह्यातील विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पतीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायाधीश आर.आर.भागवत यांनी आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (41) याला फाशीची शिक्षा तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

संतोषने पत्नी दिपालीची केली क्रूर हत्या

ही घटना 7 जून 2021 रोजी खानापूर तालुक्यातील भुड येथे घडली होती.घरगुती वादातून आरोपीने पत्नी दिपाली कदम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवले.त्यानंतर चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दिपाली कदम यांचा 11 जून 2021 रोजी मृत्यू झाला होता.

नक्की वाचा >> Pune News: आता पुन्हा पुणेकरांची धडधड वाढणार, दबक्या पावलांनी 'तो' पुन्हा आला..सर्व हालचाली कॅमेरात कैद

ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा मोठा निर्णय

या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ राहुल सुळे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा कठोर निर्णय दिला.या निकालामुळे पीडितेच्या मुलांना न्याय मिळाल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापुरात केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा! नगरसेविकेला झाल्या उलट्या, FDA टीम बेकरीत दाखल

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com