Vidrohi Sahitya Sammelan : 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव? 29 ठराव कोणते ते जाणून घ्या!

19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनामाबाबत ठराव करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 3 mins

Vidrohi Sahitya Sammelan : छत्रपती संभाजीनगरात 19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडलं. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी तीन दिवस पार पडलं. 23 फेब्रुवारी या संमेलनाची सांगता झाली. यंदाच्या विद्रोही साहित्य संमेलनातात अनेक ठरवा मांडण्यात आले. या साहित्य संमेलनात राजकीय क्षेत्रातील अनेक ठराव मांडण्यात आले. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत झालेल्या मृत्यू याचाही समावेश आहे. विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनामाबाबत ठराव करण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निःपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहण्याचा ठराव करण्यात आला.  

नक्की वाचा - ABMSS: 'मराठी भाषा संतांनी टिकवली', डॉ. तारा भवाळकरांचे अध्यक्षीय भाषण गाजले

विद्रोही साहित्य संमेलन ठराव


1) अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दिले जाणारे शासकीय अनुदान तत्काळ बंद करावे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि तासिकावर काम करणाऱ्या शिक्षकांना ते अनुदान वर्ग करण्यात यावे

2) सावित्रीबाई फुले विद्यापीठातील बोध चिन्हातील विषमतेचा प्रतीक असलेला शनिवार वाडा काढून त्याऐवजी स्वराज्याचा प्रतीक असलेला लाल महाल समाविष्ट करावा

3) पत्रकारांवर होणाऱ्या हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी

4) सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांचे स्मारक उभारण्यात यावं

5) जयपूरच्या न्यायालयासमोरील मनुचा पुतळा हटवण्यात यावा

6) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहित यांना संरक्षण मिळावे

7) समन्वय पाणीवाटप धोरणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र हा भेद टाळावा, मराठवाड्याचे हक्काचे पाणी द्यावे

8) देशातील जातनिहाय जनगणना करावी

9) ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, यासाठी सरकारने प्रयत्न करावे.

10) प्रत्येक महाविद्यालयात पाली भाषा विषय सुरू करण्यात यावा.

11) राज्यातील मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा निषेध

12) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तत्काळ बंद करण्यात यावी, शिक्षणाचे खाजगीकरण थांबावं, मोफत , दर्जेदार शिक्षण द्यावे आणि शिक्षक भरती करावी

13) गोविंद पानसरे, कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या खुणांना त्वरित शिक्षा करण्यात यावी

14) आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचे मूलनिवासी पण नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे. आदिवासींचा धर्माचा उल्लेख संविधानानुसार बंद करण्यात यावा

15) बिहारमधील बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातून काढून शासकीय मान्यता ट्रस्टकडे द्यावा

16) मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील शासकीय जमिनीवर गुरू चालवणाऱ्या, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त कष्टकरी जीविका भागवण्यासाठी जमीन कसत आहे. जमिनी त्यांच्या नावावर करून सातबारा द्यावा

Advertisement

17) जंगल निवासी यांचे अधिकार मान्य करावे, वन कायदा 2006 ची अंमलबजावणी करून दावेदारांना सातबारा उतारा देण्यात यावा

18) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहाचा दर कमी करण्यात यावा आणि कालावधी वाढवून द्यावा.

19) अनुसूचित जाती आणि जमाती त्याचबरोबर इतर मागासवर्गीय यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी बंद करण्यात आली शिष्यवृत्ती पुन्हा चालू करावी

20) परभणीतील सोमीनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस, देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी, चौकशी निःपक्षपाती होण्यासाठी नैतिकचीचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रीपदापासून दूर राहावे

21) शासकीय व निमशासकीय वर्गाला समान न्याय द्यावा आणि नकाशाच्या आधारावर बदली धोरण असावे

22) महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सर्व शासकीय कार्यक्रमांसाठी अपेक्षित असलेला निधी खर्च करण्यात यावे

23 छत्रपती संभाजीनगरमध्ये शहर उभारणाऱ्या मलिक अंबरचे स्मारक तयार करण्यात यावे

24) सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाचा निधी शासनाने इतरत्र न वळवता नियोजित उपक्रमासाठीच खर्च करण्यात यावा

25) भटक्या विमुक्त आदिवासी कलावंतांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन मिळावे. भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभा करण्यात यावे

26) भटक्या जातीमधील 42 जातींना रोजगार उपलब्ध करून द्यावा

27) ईव्हीएमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी

28) अनावश्यक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र थांबवण्यात यावे

29) महाराष्ट्र दारू बंदी करण्यात यावी