राहुल तपासे, सातारा
Satara Rain : सातारा जिल्ह्यातील अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागाने अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 239 प्राथमिक शाळांना 12 ऑगस्टपर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावळी आणि पाटण तालुक्यांचा समावेश आहे. पाटणमधील 181,महाबळेश्वर मधील 119, आणि जावळी तालुक्यातील 39 शाळांचा समावेश आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली आहे.
(नक्की वाचा- Bharat Bandh Today : आज 25 कोटींहून अधिक कर्मचारी संपावर, काय बंद अन् काय सुरू राहणार?)
नागपूरमध्येही आज शाळांना सुट्टी
नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहेत. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस दोन दिवस उलटूनही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे नागपुरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
सद्यस्थितीत नागपुरात 172.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारपर्यंत सरासरीच्या तुलनेत 40 टक्क्ययांची कमतरता होती. मात्र सलग सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरचा बॅकलॉग मात्र दूर झाला आहे.
(नक्की वाचा- Satara News: प्रेमविवाह करुन गावात आली, 1 मुलगा झाल्यानंतर दुसऱ्याच्याच प्रेमात पडली, भयंकर शेवट)
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक तालुक्यात भिवापूर 118.6, मौदा 100.3 मीमी, , रामटेक 107, काटोल 100.3, पारशिवनी 99.9, कामठी 88.8, कुही 98.2, उमरेड 80.8, नागपूर (शहर) 67.8, नागपूर (ग्रामीण) 64.7, सावनेर 65.2, कळमेश्वर 68.7, हिंगणा 57.5, काटोल 43.8, नरखेड 53.6 मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 148.9 मीमी म्हणजेच 48.9 टक्के पाऊस पडला आहे.