संकेत कुलकर्णी, पंढरपूर
छावा चित्रपटाची क्रेझ सध्या महाराष्ट्रासह देशभरात दिसून येत आहे. याच चित्रपटाच्या अनुषंगाने आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपुरात एक अनोखी ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. छावा चित्रपट पाहून थिएटरचे तिकीट दाखवल्यास हॉटेल ग्रँड येथील जेवणाच्या बिलावर तब्बल 25 टक्के इतकी भरघोस सूट देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई - पुणे अशा ठिकाणी असणाऱ्या ऑफरचे लोण आता पंढरपुरात येऊन ठेपले आहे. मात्र ह्याच ऑफर देत असताना शिवजयंतीच्या असणाऱ्या उत्साही वातावरणाचा फायदा शिवभक्तांना मिळवून देण्याची अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.
(वाचा- संपूर्ण सिनेमा पाहिला मग केली तक्रार, INOX-PVR ला द्यावे लागले 65 हजार रुपये; काय आहे प्रकरण?)
महाराष्ट्रासह देशभरात कुठेही छावा चित्रपट पाहिला आणि पंढरपुरात हॉटेल ग्रँड येथे येऊन थिएटरचे तिकीट दाखवले. तर हॉटेलच्या बिलावर 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंटच्या माध्यमातून दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर लागू केली आहे.
(नक्की वाचा- 'छावा' पाहून लहानग्याला अश्रू अनावर; VIDEO पाहून तुमचाही ऊर भरुन येईल)
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहिल्यावर प्रोत्साहन असावे. यासाठी हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंट यांच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर ठेवली आहे.