जाहिरात

संपूर्ण सिनेमा पाहिला मग केली तक्रार, INOX-PVR ला द्यावे लागले 65 हजार रुपये; काय आहे प्रकरण? 

PVR-INOX Cinema : ग्राहक न्यायालयाने 'टाईम इज मनी'असे म्हणत तक्रारदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे निर्देश पीव्हीआर सिनेमाज आणि आयनॉक्सला दिले.

संपूर्ण सिनेमा पाहिला मग केली तक्रार, INOX-PVR ला द्यावे लागले 65 हजार रुपये; काय आहे प्रकरण? 

आधी सिनेमा पाहिला आणि त्यानंतर तक्रार करुन 65000 हजार रुपयांची भरपाई देखील घेतली. बेंगळुरूमधील एका  30 वर्षीय व्यक्तीने हा कारनामा केला आहे. या व्यक्तीने PVR, INOX आणि Book my Show यांच्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी लांबलचक जाहिराती दाखवून अर्धा तास वेळ वाया घालवल्याबद्दल आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल खटला दाखल केला होता. यानंतर व्यक्तीने 65 हजार रुपये भरपाई म्हणून मिळाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिषेक एमआर यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, 2023 मध्ये त्यांनी 'सॅम बहादूर' चित्रपटासाठी 4.05 वाजताच्या शोसाठी तीन तिकिटे बुक केली होती. त्यांनी दावा केला होता की चित्रपट संध्याकाळी 6.30 वाजता संपणार होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कामावर परतण्याचं ठरवलं होतं. मात्र चित्रपटांच्या जाहिराती आणि ट्रेलर स्ट्रीम झाल्यानंतर 4.30 वाजता चित्रपट सुरू झाला, ज्यामुळे जवळपास 30 मिनिट वेळ वाया गेला.

"अर्धा तास वेळ वाया गेल्याने अभिषेक त्या दिवशी इतर नियोजित कार्यक्रमांना आणि लोकांना भेटू शकले नाही. त्यामुळे असे नुकसान सहन करावे लागले आहे ज्याची भरपाई पैशात करता येणार नाही. जाहिराती दाखवून फायदा घेण्यासाठी शोच्या वेळा चुकीच्या पद्धतीने कळवल्या," असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

(नक्की वाचा-  Anglerfish : समुद्रात 2 हजार मीटर खाली सापडला दुर्मिळ मासा, खासियत ऐकून व्हाल चकीत)

न्यायालयाने काय म्हटलं?

ग्राहक न्यायालयाने 'टाईम इज मनी'असे म्हणत तक्रारदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे निर्देश पीव्हीआर सिनेमाज आणि आयनॉक्सला दिले. तक्रारदाराचा वेळ वाया घालवल्याबद्दल आणि चुकीच्या व्यापार पद्धतीबद्दल 50 हजार रुपये, मानसिक त्रासासाठी 5 हजार रुपयेये आणि तक्रार दाखल करणे, इतर सवलतीसाठी 10 हजार रुपये देण्याचे आदेश पीव्हीआर सिनेमाज आणि आयनॉक्सला दिले. 

न्यायालयाने 15 फेब्रुवारीच्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, इतरांच्या वेळेचा आणि पैशाचा फायदा घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. न्यायालयाने पीव्हीआर सिनेमाज आणि आयनॉक्सला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. BookMyShow हे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असल्याने आणि जाहिरातींच्या स्ट्रीमिंग वेळेवर त्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ते कोणताही क्लेम देण्यास जबाबदार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Ruddy Crake Bird : शहरीकरणामुळे अधिवास टिकवण्यासाठी संघर्ष; लाजऱ्या 'फटाकडी'च्या विश्वाची थक्क करणारी सफर )

PVR-INOX चं स्पष्टीकरण

पीव्हीआर सिनेमाज आणि आयनॉक्स यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, कायद्यानुसार जागरूकता पसरवण्यासाठी काही पब्लिक सर्व्हिस अनाउन्समेंट करणे बंधनकारक आहे. मात्र न्यायालयाने म्हटले चित्रपट सुरू होण्याच्या  10 मिनिटांच्या आत आणि चित्रपटाच्या मध्यांतराच्या काळात हे व्हिडीओ दाखवले पाहिजेत. न्यायालयाने पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स यांना ग्राहक कल्याण निधीत एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम भरण्यास सांगितले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: