जाहिरात

Marathi Hindi Row: मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तथाकथित...' 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल

Pravin Kumar Teotia On Marathi Hindi Language Row: मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते?

Marathi Hindi Row: मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तथाकथित...' 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल

Pravin Kumar Teotia Hindi Controversy: महाराष्ट्रात सध्या मराठी- हिंदी वादाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या वादावरुन एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला. एकीकडे मनसेने मराठीवरुन आक्रमक भूमिका घेतली असतानाच याविरोधात मुंबईतील परप्रांतीयांनीही मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. अशातच या वादात आता 26-11 हल्ल्यामध्ये दहशतवादविरोधी कारवायांचे नेतृत्व करणाऱ्या माजी मरीन कमांडो प्रविण तेवतिया यांनी उडी घेतली आहे. प्रविण तेवतिया यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे. 

BMC Election : भाषावादाचं राजकारण तापलं, पण मुंबईकर का आहेत नाराज? वाचा Ground Report

काय आहे तेवतिया यांची पोस्ट? 

माजी मरीन कमांडो (मार्कोस) असलेल्या प्रविण कुमार तेवतिया यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ", '26/11 च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. मी यूपीचा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते? देशाचे विभाजन करू नका. हास्याला भाषा नसते,"अस त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत त्यांनी वर्दीतील एक फोटोही पोस्ट केला आहे.

 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान प्रवीण कुमार तेवतिया यांनी त्यांच्या पथकाचे नेतृत्व केले. या काळात त्यांच्या टीमने ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेवर होते. या कारवाईदरम्यान प्रवीण तेवतिया जखमी झाले, त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र त्यांनी शौर्य दाखवत ताजमधील लोकांची सुटका केली. त्यांच्या धाडसीपणामुळेच ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या जवळपास 150 लोकांचे प्राण वाचले.  

दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन शनिवारी मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी हिंदीविरोधात आक्रमक भूमिका घेत परप्रांतियांना थेट इशारा दिला. मुद्दाम कोणाला डिवचायचे नाही मात्र मराठीचा अपमान होत असेल तर कानाखाली जाळ काढायचा, असा थेट आदेशच त्यांनी मनसैनिकांना दिला. 

Assembly News: बाहेर मराठीचा डंका, विधानसभेत हिंदीतून चर्चा! पुढे काय घडलं?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com